E-Nomination Application : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या नियमांमध्ये सतत सुधारणा करत असते. आता EPFO ने खातेदारांना घरबसल्या एक सुविधा दिली आहे आणि ती म्हणजे ई-नॉमिनेशन ही. या सेवेद्वारे खातेधारक आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे ऑनलाइन नोमिनेशन करू शकतो.
कुठल्याही कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर या नोमिनेशनचा फायदा त्याच्या घरातील व्यक्तींना घेता येतो. ई-नामांकन भरून कुटुंबातील सदस्य भविष्य निर्वाह निधी, EPS-पेन्शन आणि EDLI विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
कुटुंबातील व्यक्ती म्हणजेच पालक, पती/पत्नी, भावंड किंवा कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश या नोमिनेशनमध्ये केला जातो. EPFO कडून विम्याची कमाल मर्यादा 7 लाख रुपयांपर्यंत आहे.
ई-नामांकनाचे काय फायदे आहेत?
- कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना Nominate केले जाऊ शकते. या Nomination मधून त्यांना समान रक्कम मिळते.
- Nominee कधीही बदलला जाऊ शकतो.
कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर Nominee E-Nomination द्वारे Online Claim करू शकतो.
E-Nomination ला तुम्ही कसे Apply कराल?
- www.unifiedportal-mem-epfindia.gov.in वर जा.
- UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- View Profile वर जाऊन पासपोर्ट फोटो अपलोड करा.
- Management Section वर जा आणि E-Nomination वर क्लिक करा.
- Nomineeचे नाव, आधार क्रमांक, फोटो, जन्मतारीख, बँक खाते क्रमांक टाका.
- पुढे ई-साइन वर क्लिक करा आणि आधार कार्डद्वारे OTP जनरेट करा.
- आधारशी लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला ओटीपी Enter करा.
- तुमचे E-Nomination अकांऊट तयार होईल.