25 वर्षांची पेंशन योग्य सेवा आणि ₹15,000 पेंशन योग्य वेतन हे गृहीत धरल्यास ₹5,357 मासिक रक्कम मिळते. पण प्रत्येक ईपीएस सदस्याची वास्तविक पेन्शन याच प्रमाणात असेल असे नाही.
यूएएन, ईपीएफओ पासबुक आणि सर्व्हिस डिटेल्स तपासून आपल्या ईपीएस नोंदी व्यवस्थित आहेत का, हे पाहणे कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.
ईपीएफ खाते निष्क्रिय झाले म्हणजे त्यातील पैसे संपले किंवा सरकारने ते जप्त केले, असा अर्थ होत नाही. ईपीएफओच्या अधिकृत प्रक्रियेनुसार निष्क्रिय खात्यांमध्ये शिल्लक रक्कम असू शकते
ईपीएफओच्या अपडेटेड मेंबर पोर्टलमध्ये ऑनलाईन सर्व्हिसनंतर मेंबर सर्व्हिस हिस्ट्री या पर्यायातून रोजगाराशी संबंधित नोंदी पाहता येतात.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निर्धारित प्रक्रियेनुसार उच्च वेतनावर पेन्शनचा पर्याय स्वीकारलेले आणि संबंधित अटी पूर्ण करणारे सदस्य यासाठी पात्र ठरतात.
PF रक्कम UPI किंवा ATM द्वारे काढण्याची सुविधा सध्या विविध तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियेत आहे. या सेवेसाठी आवश्यक डिजिटल पायाभूत सुविधा, सुरक्षा यंत्रणा आणि बँकिंग नेटवर्कची जोडणी यावर काम सुरू आहे.
सध्या EPFO अंतर्गत अनिवार्य सदस्यत्वासाठी मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता (DA) मिळून ₹15,000 पर्यंतची मर्यादा लागू आहे.
देशातील लाखो कर्मचारी नोकरी बदलताना, निवृत्तीनंतर किंवा इतर पात्र कारणांसाठी PF क्लेम करतात. अशा परिस्थितीत जलद सेटलमेंटमुळे आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होईल.
CBIने दाखल केलेल्या गुन्ह्यात नोकिया कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांनी बनावट कर्मचारी नोंदी तयार करण्यात किंवा त्यांना मंजुरी मिळवून देण्यात भूमिका बजावली का, याचा तपास सुरू आहे.
ईपीएस अंतर्गत किमान मासिक पेन्शन ₹7,500 करण्याबाबत विविध कर्मचारी संघटनांकडून मागण्या प्राप्त झाल्या आहेत.
केवळ जुना PF खाते क्रमांक नसल्यामुळे तुमचे पैसे कायमचे अडकत नाहीत. मात्र, सध्या फक्त खाते क्रमांक न आठवल्याच्या आधारावर जुने खाते शोधण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन सुविधा उपलब्ध करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.
EPFO 3.0 अंतर्गत PF काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि कागदविरहित करण्याचे उद्दिष्ट आहे. भविष्यात UPI आणि इतर डिजिटल माध्यमांतून पात्र सदस्यांना अधिक जलद रक्कम मिळेल.
राज्यसभेत केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2026 पर्यंत देशभरातील निष्क्रिय EPF खात्यांमध्ये ₹9,330.56 कोटी जमा आहेत.
EPFO ने आता EPFO 3.0 वर काम सुरू केले आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकसमान निवृत्तीवेतन प्रणाली लागू करण्याची तयारी सुरू आहे.आता ही EPFO 3.0 ही वेतन प्रणाली नक्की काय आहे याचा फायदा कोणाला होणार यासंदर्भात सविस्तर महिती तुम्हाला या लेखामध्ये देणार आहोत.
अनेक कर्मचारी नोकरीच्या काळात विविध कारणांसाठी वारंवार PF काढत असल्याने निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता कमी होते.
EPFO च्या नियमानुसार 58 वर्षे हे निवृत्तीचे महत्त्वाचे वय मानले जाते. या वयानंतर खाते निष्क्रिय श्रेणीत जाण्याच्या नियमांनुसार पुढे नवीन व्याज जमा होत नाही.
नोकरी सोडल्यानंतर पेन्शनसाठी पात्रता नसलेल्या सदस्यांसाठी विथड्रॉल बेनिफिटचे नियम सुधारण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये सेवा सोडल्यानंतर ठराविक प्रतीक्षा कालावधीनंतरच लाभ घेता येईल.
एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत गेल्यानंतर तुमचा UAN तोच राहतो. मात्र, प्रत्येक नियोक्त्याकडे स्वतंत्र PF Member ID तयार होऊ शकतो.
नोकरदार वर्गासाठी आर्थिक आधार असणारी एक बाब म्हणजे पीएफ खात्यात असणारे पैसे. याच EPF किंवा PF खात्यासंदर्भातील काही नवे नियम सरकारनं लागू केले आहेत.
कोट्यवधी EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इतक्या दिवसांपासून ज्या गोष्टींची वाट पाहत आहेत, तो क्षण आला आहे. अकाऊंटमध्ये भरपूर पैसा येणार आहे.
EPFO ने क्लेम प्रक्रिया अधिक वेगवान आणि कागदविरहित करण्यावर भर दिला आहे.