नवी दिल्ली : भारताने (India) कोविड-19 (Covid19) ससंर्गामुळे दोन वर्ष स्थगित केलेली 156 देशांसाठीची ई-पर्यटक व्हिसा (E-Tourism Visa) पुन्हा सुरु केले आहे. अमेरिका आणि जपानच्या नागरिकांना 10 वर्षांचा व्हिसा देखील पुन्हा सुरु करण्यात आलेला आहे.
एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, सरकारने निर्णय घेतलाय की, पाच वर्षासाठी देण्यात येणारा ई- पर्यटक व्हिसा जी मार्च 2020 पासून बंद करण्यात आली होती. त्या 156 देशासाठी पुन्हा एकदा ई-पर्य़टन व्हिसा सुरु करण्यात आला आहे.
156 देशांच्य़ा नागरिकांना आता भारतात पर्यटनासाठी येता येणार आहे. 2019 च्या नव्या नियमानुसार त्यांना व्हिसा बहाल केला जाईल.
टुरिस्ट आणि ई-टुरिस्ट व्हिसावरील परदेशी नागरिक 'वंदे भारत मिशन' किंवा 'एअर बबल' योजनेंतर्गत किंवा विमानतळांच्या नियुक्त सागरी इमिग्रेशन चेक पोस्ट्स (IPs) किंवा विमानतळांच्या ICPs द्वारे फ्लाइटने भारतात प्रवेश करू शकतील. डायरेक्टरेट जनरल ऑफ एव्हिएशन (DGCA) किंवा नागरी उड्डयन मंत्रालयाने परवानगी दिलेल्या नागरी उड्डाणे यांचा देखील समाविष्ट आहे.
कोणत्याही परिस्थितीत, पर्यटक व्हिसा किंवा ई-टुरिस्ट व्हिसावर असलेल्या परदेशी नागरिकांना जमिनीच्या सीमेवरून किंवा नदी मार्गाने प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारी निर्देश अफगाणिस्तानच्या नागरिकांना लागू होणार नाहीत, जे केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या स्वतंत्र निर्देशांद्वारे शासित राहतील.