Viral Video: 'या' सोप्या पद्धतीने काढा भारताचा नकाशा, लहान मुलाने सांगितली भन्नाट ट्रिक

एका लहान मुलाने भारताचा नकाशा काढण्याची सोपी पद्धत सांगितली आहे. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 3, 2024, 05:48 PM IST
 Viral Video: 'या' सोप्या पद्धतीने काढा भारताचा नकाशा, लहान मुलाने सांगितली भन्नाट ट्रिक title=

Video Viral : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही कॉमेडी असतात तर काही व्हिडीओ हे आपल्यासाठी फायदेशीर देखील असतात. सध्या एका लहान मुलाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो लहान मुलगा भारताचा नकाशा काढताना दिसत आहे. या मुलाने काही सेकंदात भारताचा नकाशा काढला आहे. सोशल मीडियावर त्याच कौतुक होत आहे. 

भारताचा नकाशा काढण्याचा प्रयत्न केला तर अनेक लोकांना तो व्यवस्थित काढता येत नाही. कित्येक प्रयत्न केले तरी तो व्यवस्थित दिसत नाही. जर तुम्हाला देखील काही सेकंदात भारताचा नकाशा काढायचा असेल तर हा व्हिडीओ पाहा. 

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये लहान मुलगा काही सेकंदात भारताचा नकाशा काढताना दिसत आहे. भारताचा नकाशा काढणे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. मात्र, सध्या लहान मुलाच्या या ट्रीकने तुम्ही देखील काही सेकंदात नकाशा काढू शकता. हा लहान मुलगा काही इंग्रजी अक्षरांपासून नकाशा काढत आहे. ज्यामध्ये त्याने एका फळ्यावर X,J,K,V अशी अक्षरे काढली आहेत. यामध्ये त्याने सुरुवातीला X अक्षरापासून खडूच्या मदतीने तो नकाशा काढण्यास सुरुवात करत आहे. त्यानंतर त्याने जी अक्षरे समोरासमोर काढली आहेत. त्यांना तो खडूच्या मदतीने जोडत आहे. या सोप्या पद्धतीने त्याने काही सेकंदात भारताचा नकाशा काढला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सोशल मीडियावर या व्हिडीओला भारताचा नकाशा काढण्याची सोपी ट्रिक असं कॅप्शन दिलं आहे. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स केल्या आहेत. तर काही चाहत्यांनी त्याच्या या सोप्या ट्रीकचं कौतुक देखील केलं आहे. हा व्हिडीओ pranavs_alley या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.