मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात आहात आणि तुमचे शिक्षण कमी आहे तरी काळजी करु नका. महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये पोस्टात काम करण्याची सुवर्ण संधी भारतीय डाक विभागाने उप्लब्ध केली आहे. दोन्ही राज्यातील भरती प्रक्रिया 27 एप्रिलपासून सुरु झाली आहे. नोंदणीसाठी पुढील वेबसाईटवर क्लीक करा. https://appost.in/gdsonline/home.aspx
महाराष्ट्रात ग्रामीण पोस्टमनच्या 2482 पदांवर भरती होणार आहे तर बिहार सर्कलमध्ये 1940 पदांवर भरती होणार आहे.
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून स्थानिक भाषा, इंग्रजी आणि गणिता विषयातून 10 वी पास होणे बंधनकारक आहे. त्याच बरोबर मान्यता प्राप्त संस्थेमधून 60 दिवसांचा बेसिक कंप्यूटर कोर्स करणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असावे.
ओपन, ओबीसी, ईडब्लूएस इ. वर्गासाठी 100 रुपये शुल्क, तर एससी, एसटी, महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही.
ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) - टीआरसीए स्लॅबमध्ये 4 तासांसाठी 12 हजार रुपये
टीआरसीए स्लॅबमध्ये 5 तासांसाठी 14 हजार 500 रुपये असणार आहे
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) किंवा डाक सेवक - टीआरसीए स्लॅबमध्ये 4 तासांसाठी 10 हजार रुपये. तर, टीआरसीए स्लॅबमध्ये 5 तासांसाठी 12 हजार रुपये असणार आहे.
GDS पदासाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. थेट 10वीच्या गुणांच्या आधारे ही प्रक्रिया होणार आहे.