'चीनचा डिंग लिरेन जाणुनबुजून डी गुकेशसमोर हारला'; इंटरनॅशनल चेस फेडरेशनने अखेर सोडलं मौन, 'मोठी चूक....'

सिंगापूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्यात चीनचा डिंग लिरेन भारताच्या डी गुकेशकडून हेतुपुरस्सर पराभूत झाल्याच्या दाव्यावर FIDE प्रमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

शिवराज यादव | Updated: Dec 15, 2024, 08:29 PM IST
'चीनचा डिंग लिरेन जाणुनबुजून डी गुकेशसमोर हारला'; इंटरनॅशनल चेस फेडरेशनने अखेर सोडलं मौन, 'मोठी चूक....' title=

सिंगापूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्यात चीनचा डिंग लिरेन भारताच्या डी गुकेशकडून हेतुपुरस्सर पराभूत झाल्याच्या दावा करण्यात आला आहे. यानंतर इंटरनॅशनल चेस फेडरेशन (FIDE) यावर प्रतिक्रिया दिली. गुकेशच्या ऐतिहासिक विजयानंतर रशियन बुद्धिबळ महासंघाचे प्रमुख आंद्रेई फिलाटोव्ह यांनी डिंगवर मुद्दाम सामना गमावल्याचा आरोप केला होता. रशियन न्यूज एजन्सी TASS ने फिलाटोव्हचा हवाला देऊन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाला (FIDE) चौकशी सुरू करण्याचं आवाहन केलं आहे. डिंगने निर्णायक गेम 14 मध्ये एक मोठी चूक केली, ज्यामध्ये त्याच्या राजाला लागून असलेल्या प्याद्याला हलवले, ज्यामुळे गुकेशला जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनता आलं.

"शेवटच्या खेळाच्या निकालामुळे व्यावसायिक आणि बुद्धिबळ चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला. निर्णायक विभागात चिनी बुद्धिबळपटूची कृती अत्यंत संशयास्पद आहे आणि FIDE द्वारे स्वतंत्र तपासणी आवश्यक आहे," असं फिलाटोव्ह यांनी TASS ला सांगितले.

World Chess Champion: 'मी आता या सर्कसचा भाग नाही,' मॅग्नस कार्लसनचं धक्कादायक विधान; म्हणाला 'मी डी गुकेशला...'

 

"ज्या स्थानावर डिंग लिरेन होता तेथून सामना गमावणं प्रथम श्रेणीतील खेळाडूसाठीही अवघड आहे. आजच्या खेळातील चिनी बुद्धिबळपटूचा पराभव अनेक प्रश्न निर्माण करतो आणि तो मुद्दाम केलेला दिसतो," असं त्यांनी पुढे म्हटलं आहे. 

मात्र, FIDE चे प्रमुख Arkady Dvorkovich यांनी डिंगने मुद्दाम सामना गमावल्याचा दावा फेटाळून लावला आहे. खेळ म्हणजे चुका करणे आणि त्यानंतर पुन्हा उसळी घेण हाच आहे असं त्यांनी ठामपणे सांगितं.

"खेळ हा चुकांबद्दल असतो. चुका नसत्या तर फुटबॉलमध्ये एकही गोल झाला नसता. प्रत्येक खेळाडू चुका करतो पण त्यामुळेच आपण उत्सुक असतो की प्रतिस्पर्ध्याला चुकीचा वापर करण्याचा मार्ग सापडतो की नाही," अंसं ते म्हणाले, दरम्यान, गुकेशने सामन्यातील 14 वा आणि शेवटच्या टप्प्यात त्याच्या चिनी प्रतिस्पर्ध्याच्या 6.5 विरुद्ध आवश्यक 7.5 गुण मिळवले. विजेता म्हणून त्याला तब्बल 11.3 कोटींची रक्कम मिळाली आहे.