एक्झिट पोल : भाजपला काँग्रेसची कडवी टक्कर, तीन राज्यांत काँग्रेसची मुसंडी

पाच राज्यांच्या निवडणुकीचे एक्झिट पोल हाती आले असून यात भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आकड्यावरुन दिसून येत आहे. टाइम्स नाऊ, सीएमएक्स, सी व्होटर, जन की बात यांचे एक्झिट पोल हाती आलेत. 

सुरेंद्र गांगण | Updated: Dec 7, 2018, 11:37 PM IST
एक्झिट पोल : भाजपला काँग्रेसची कडवी टक्कर, तीन राज्यांत काँग्रेसची मुसंडी  title=

नवी दिल्ली : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होणार याकडं सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या निवडणुकांमध्ये त्या त्या राज्यांच्या स्थानिक प्रश्नांना आणि मुद्दांना प्राधान्य असलं तरी या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होणार यावर देशाच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे. दरम्यान, एक्झिट पोल हाती आले असून यात भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आकड्यावरुन दिसून येत आहे. टाइम्स नाऊ, सीएमएक्स, सी व्होटर, जन की बात यांचे एक्झिट पोल हाती आलेत. 

२०१९ ला होणा-या महा फायनलची या पाच राज्यांमधल्या निवडणुका म्हणजे महा सेमिफायनल आहेत. मतदान यंत्रांमध्ये मतदारांनी आपला कौल आता बंदिस्त केलाय. तो नेमका काय हे ११ डिसेंबरला स्पष्ट होईलच. पण त्याबद्दलचा अंदाज EXIT POLL मधून बांधला जात असतो. हा अंदाज काँग्रेससाठी चांगला असल्याचे दिसून येत आहे. तर भाजपसाठी तारेवरची कसरत असल्याचे दिसून येत आहे. पुन्हा सत्ता सारख्यासाठी भाजपला यश येते की नाही हे ११ डिसेंबरला स्पष्ट होईल. मात्र, तीन राज्यातून भाजपची सत्ता जाणार असेच चित्र दिसत आहे. 

एक्झिट पोलः छत्तीसगडमध्ये 

- काँग्रेसचे पुन्हा सरकार बनण्याची शक्यता. भाजपला ३५-४३, काँग्रेसला ४०-५० आणि मायावतींच्या बसपाला ३-७ जागा मिळण्याची शक्यताः रिपब्लिक-सीव्होटरचा अंदाज.

- छत्तीसगडमध्ये रमन सिंह चौथ्यांदा भाजपचे सरकार बनवण्याची शक्यता. इंडिया टीव्ही-सीएनएक्सचा अंदाज.

- छत्तीसगडमध्ये भाजपला ३८ टक्के, काँग्रेसला ४१ टक्के तर जेसीसला १३ टक्के मते मिळण्याची शक्यता. न्यूज नेशनचा अंदाज.

एक्झिट पोलः तेलंगणात 

तेलंगणात पुन्हा एकदा चंद्रशेखर राव यांचे सरकार बनणार असल्याचा अंदाज. टीआरएसला ६६, भाजपला ७, काँग्रेसला ३७ तर अन्य पक्षांना ९ जागा. रिपब्लिक आणि सी व्होटरचा अंदाज.

एक्झिट पोलः राजस्थानात 

- काँग्रेसला ४२ टक्के, तर भाजपला ३७ टक्के आणि इतरांना २१ टक्के मते मिळण्याची शक्यता. इंडिया टूडे आणि अॅक्सिस माय इंडियाचा अंदाज.

काँग्रेसला १०५ जागा तर भाजपला ८५ जागा मिळतील. राजस्थानात काँग्रेस सरकार स्थापणार. टाइम्स नाउ-सीएनएक्सचा अंदाज.

एक्झिट पोलः मध्य प्रदेश

मध्य प्रदेशच्या निकालावरून सट्टाबाजार तेजीत आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस भाजपाला जोरदार टक्कर देईल, यावर मोठा सट्टा लागलाय.  मध्यप्रदेशात सत्तांतर होण्यासाठी अंदाजे १ हजार कोटींचा सट्टा लागलाय. तर राज्यात भाजपा-काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होईल, यावर ५०० कोटींचा सट्टा लागलाय. शिवराजसिंग चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री होतात की कमलनाथ किंवा ज्योतिरादित्य शिंदे यांची वर्णी लागते, यावरही जोरदार सट्टा लागलाय.

Madhya Pradesh:

Agencies BJP Congress BSP Others
CNX 126 89 06 09
AXIS 102-120 104-122 00 4-11
JAN KI BAAT 108-128 95-115 00 07
CSDS 94 126 00 10
C VOTER 90-106 110-126 00 10-14
INDIA TV 122-130 86-92 00 15
PACE MEDIA 98-108 110-120 00 10-14

Rajasthan:

Agencies BJP Congress BSP Others
CNX 85 105 02 07
AXIS 55-72 119-141 00 4-11
JAN KI BAAT 93 91 00 15
C-VOTER 52-68 129-145 00 5-11
CSDS 83 101 00 15

Chhattisgarh:

Agencies BJP Congress BSP+ Others
CNX 42-50 32-38 6-8 1-3
AXIS 21-31 55-65 4-8 00
CSDS 52 35 00 03
MY PACE 36-42 45-51 00 4-8
NETA 43 40 00 07
C-VOTER 35-43 42-50 3-7 00

Telangana:

Agencies TRS Cong+TDP BJP OTHERS
CNX 66 37 07 09
JAN KI BAAT 58 45 06 10
NETA 57 46 6 10
C-VOTER 50-65 38-52 4-7 8-14

Mizoram:

Agencies ZPM Congress MNF Others
C-VOTER 3-7 14-18 16-20 0-3
CNX 00 16 18 06
MY AXIS 8-12 8-12 16-22 00