Lok Sabha Exit Poll Results 2024 Live : लोकसभा निवडणूक 2024 चे एक्झिट पोल आले आहेत. झी 24 तासवर एक्झिट पोलचे अंदाज पाहाता येणार आहेत. विविध संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार NDA तिसऱ्यांदा सत्तेवर येणाच्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीचं सत्तेचं स्वप्न अपूर्णच राहाण्याची शक्यता आहे.
ABP-CVoter Exit Poll: महाराष्ट्रात काय होणार?
एबीपी-सीवोटर एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर असणार आहे. महाराष्ट्रात 48 जागांपैकी महायुतीला 22-26 तर महाविकास आघाडीला 23-25 जागा मिळण्याची शक्यता आहे.
India News-D-Dynamics Exit Poll : NDA तिसऱ्यांदा सत्तेत येणार?
इंडिया न्यूज-डी-डायनॅमिक्सच्या एक्झिट पोलनुसार एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्या आहे. या एक्झिट पोलमध्ये एनडीए आघाडीला 371 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इंडिय आघाडीला 125 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. इतर पक्षांना 47 जागा मिळतील.
Republic TV-P MARQ Exit Poll : अबकी बार NDA सरकार!
रिपब्लिक टीवी-पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार एनडीला 359 जागा मिळण्याची शक्यता असून तिसऱ्यांदा सत्तेत राहिल. तर इंडिया आघाडीला 154 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांना 30 च्या आसपास जागा मिळू शकतील.
Republic Bharat-MATRIZE Exit Poll: दिल्लीत कोणाची सत्ता?
रिपब्लिक भारत-मॅटराइजच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत NDA ला 5 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.तर इंडिया आघाडीला 0-2 जागा मिळू शकतील.
Times Now-ETG Research का Exit Poll: झारखंडमध्ये काय असणार निकाल
टाइम्स नाउ-ईटीजी रिसर्चच्या एक्झिल पोल नुसार 14 लोकसभा जागा असलेल्या झारखंडमध्ये भाजप+ ला 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला केवळ 1 जागेवर समाधान मानावं लागेल.
India Today-Axis My India का एग्जिट पोल : केरळात काय निकाल?
इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप केरळात खातं उघडेल. केरळात भाजपला 2-3 जागा मिळतील. तर सत्ताधारी UDF पार्टिला 17-18 जागा मिळण्याची शक्यता आहे.
Desclaimer: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व 7 टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले असून 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. त्याआधी, ZEE 24 Taas ने आपल्या दर्शकांसाठी एक मेगा एक्झिट पोल आणला आहे. या मेगा एक्झिट पोलमध्ये आम्ही देशातील अनेक मोठ्या एजन्सीचे एक्झिट पोल डेटा दाखवणार आहोत. दरम्यान झी 24 तास जी आकडेवारी दाखवेल ती वेगवेगळ्या एजन्सींच्या सर्वेक्षणातून मिळवलेली आकडेवारी आहे. ज्यासाठी 'झी 24 तास' जबाबदार नाही. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नाहीत, फक्त एक्झिट पोल आहेत.