दोन बायकांचा एकच नवरा! 'ही' अट मान्य केली तर दोघींसोबत… नेमकं प्रकरण काय?

दोन बायकांचा एकच नवरा असून गेल्या 15 वर्षांपासून फॅमिली कोर्टात वाद सुरु आहे. दोघींसोबत राहण्यासाठी कौटुंबिक समुपदेशन केंद्राने काही अटी ठेवल्या आहेत. हे प्रकरण ऐकून तुम्हाली अवाक् व्हाल. 

Updated: Sep 4, 2023, 11:35 AM IST
दोन बायकांचा एकच नवरा! 'ही' अट मान्य केली तर दोघींसोबत… नेमकं प्रकरण काय? title=
extra marital affairs 1 husband 2 wives husband live with both wives for 15 days each every month trending viral news

Husband Wife News : विवाह बाह्य संबंध, एक बायको असताना दुसरं लग्न अशा अनेक घटना दिवसेंदिवस समोर येतं आहे. एक लग्न झालं असताना नवऱ्याची दुसरी बायको असल्याचं समजतं तेव्हा अशी प्रकरणं फॅमिली कोर्टात जातात. अशावेळी फॅमिली कोर्ट आणि कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे (Family Counseling Centre) यांच्यासमोर अशा प्रकरणावर तोडगा काढणं कठीण होऊन जातं. पण नुकताच एका विचित्र प्रकरण समोर आलं असून ते ऐकून तुम्ही अवाक् व्हाल. दोन बायकांचा एकच नवरा असून हे प्रकरण गेल्या  15 वर्षांपासून फॅमिली कोर्टात सुरु आहे. आता हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे (Family Counseling Centre) आहे. या केंद्राने एक तोडगा काढला असून तो नवरा दोन्ही बायकोसोबत...

दोन बायकांचा एकच नवरा!

झालं असं की, एका व्यक्तीन लग्न केलं, त्यानंतर पहिल्या बायकोसोबत त्याचे अनेक वेळा भांडण होतं होती. त्यामध्ये सतत मतभेद होत होते. बायकोसोबतचे वाद विकोपाला गेले. अखरे त्यांनी एकमेकांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आणि हे प्रकरण कोर्टात गेले. कोर्टात घटस्फोटावर वाद सुरु असतानाच या प्रकरणाला धक्कादायक वळण आले. कोर्टात घटस्फोटाचा वाद सुरु असताना त्याने दुसऱ्या सोबत लग्न गाठ बांधली. पहिल्या पत्नीला नवऱ्याने लग्न केल्याचं कळताच तरी परत त्याच्यासोबत नांदायला आली. त्यामुळे हे प्रकरण अजून किचकट झाले. 

त्या व्यक्तीने दुसऱ्यांदा लग्न करुनही त्याला पहिल्या बायकोला त्याला सोडायचं नव्हतं. पहिल्या पत्नीचंही तिच्याबद्दल हेच मत होतं. त्यामुळे यावर तोडगा काढणं कौटुंबिक समुपदेशन केंद्राला कठीण जातं होतं. (extra marital affairs 1 husband 2 wives husband live with both wives for 15 days each every month trending viral news)

कौटुंबिक समुपदेशन केंद्राने या वादावर तोडगा काढण्यासाठी एक फॉर्म्यूला तयार केला असून अशा विचित्र प्रकरणावर ते मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, नवरा 15 दिवस एका पत्नीसोबत आणि उर्वरित 15 दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहणार आहे. त्याला दोन्ही पत्नींची काळजी घ्यावी लागणार आहे आणि त्यांचा खर्च उचलावा लागणार आहे. 

गेल्या 15 वर्षांपासून न्यायालयात हे प्रकरण सुरु होते त्यामुळे या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी कौटुंबिक समुपदेशन केंद्रा हा मार्ग शोधून काढला आहे. त्या व्यक्तीच्या दुसऱ्या पत्नीला दोन मुलंदेखील आहेत. मुलांचा खर्चही त्यांना उचलावा लागणार आहे. दरम्यान हा विचित्र घटना मध्य प्रदेशातील (Uttar Pradesh) उज्जैनमधील (Ujjain News) आहे.