Gold Rate Today | भाव कमी झाल्याने सुवर्ण खरेदी वाढली; चांदीतही मोठी घसरण

Gold Silver Rate today : लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात आज स्थिरता दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होतेय.  

Updated: Jan 4, 2022, 04:34 PM IST
Gold Rate Today | भाव कमी झाल्याने सुवर्ण खरेदी वाढली; चांदीतही मोठी घसरण title=

मुंबई : लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात आज स्थिरता दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होतेय. आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे.  बुधवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 48,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 49,260 प्रति 10 ग्रॅम आहे.

MCX 

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX मध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत सोन्याचे दर प्रती तोळे 47,874 रुपये इतकी ट्रेड करीत होती. तर चांदीचे दर 61855 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होते.

22 कॅरेट सोन्याची किंमत

14 डिसेंबर रोजी मुंबई सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत 48,260 होती. त्याच वेळी, आजही 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49,260 रुपये होता.

चांदीच्या किमतीत घट

चांदी काल 62400 रुपये किलोने विकली जात होती, ती आज मुंबईत 61,700 रुपये विकली जात आहे.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. ॉ

24 कॅरेट सोने आलिशान असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.