१ डिसेंबरपासून वाहनांसाठी फास्टटॅग होणार अनिवार्य

स्टॅग हा वाहनांच्या स्क्रिनवर लागणार असून याला रिचार्ज करावे लागणार आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 2, 2017, 11:44 PM IST
१ डिसेंबरपासून वाहनांसाठी फास्टटॅग होणार अनिवार्य title=

मुंबई : तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण १ डिसेंबरपासून नियमात काही बदल होत आहेत. तुमच्या चारचाकी वाहनाला फास्टॅग लावणे हे अनिवार्य होणार आहे. केंद्र सरकाने गुरूवारी काढलेल्या अधिसूचनेत याची माहिती देण्यात आली आहे. परिवहन मंत्रालयातर्फे याआधीच ही पद्धत लागू करण्यात आली आहे.

टोल भरायला लागणारी लाबंच लांब रांग, वाहनांची ओळख पटण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. परिवहन मंत्रालयाच्या सुचनेनंतर सर्व चारचाकी वाहनांना फास्टॅग लावण्यात येणार आहेत. येणाऱ्या दिवसात हे काम जलदगतीने होत असलेले पहायला मिळणार आहे. फास्टॅग हा वाहनांच्या स्क्रिनवर लागणार असून याला रिचार्ज करावे लागणार आहे. 

काय होणार फायदा

फास्टॅग लावलेल्या चारचकी वाहनांना टोलच्या रांगेत थांबण्याची गरज राहणार नाही. फास्टॅगचे विशिष्ट अकाऊंट तयार असेल त्यातून टोलचे पैसे आपोआप कट होणार आहेत. तसेच टोलनाक्यावर वाहनाची ओळखही होणार आहे. यातील रक्कम संपल्यानंतर फास्टॅगला पुन्हा रिचार्ज करावा लागणार आहे. टोल प्लाझावरच्या लांबच लांब रांगांमधून तुमची सुटका होणार आहे.

असे असले तरीही फास्टॅग लावलेल्या वाहनांची संख्या तुलनेत वाढताना दिसत नसणे ही सरकारसाठी चिंतेची बाब ठरत आहे.