लखनऊ : आपल्याला तर हे माहित आहे की लहान मुलं हल्ली फोनच्या इतक्या आहारी गेले आहे की, त्यांच्यासाठी तो एक प्रकारचा नशाच आहे. त्यामुळे अनेक मुलांना जर फोनवरुन बोललं गेलं किंवा त्यांचा फोन बाजूला ठेवायला लावलं तर ते खूप चिडू लागतात. ज्यामुळे बहुतेक पालक आपल्या मुलांच्या या सवयीने कंटाळले आहेत. सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामुळे संपूर्ण शहराला धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेशातील संगम शहर प्रयागराज येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे, इथे वडिलांच्या टोमण्याला कंटाळून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
मोबाईलवर सतत गेम खेळल्यामुळे वडिलांनी त्याला शिवीगाळ केल्याचे सांगितले जात आहे. रात्री उशिरा वडिलांनी शिवीगाळ केल्याने विद्यार्थी संतापून खोलीत गेला. तेथे त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी घरच्यांनी दरवाजा ठोठावला असता त्याने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर खिडकीतून पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. याची तत्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.
विद्यार्थ्याचे वडील रघुनाथ प्रसाद गुप्ता यांनी सांगितले की, ते रेल्वेत काम करतात. त्यांना दोन मुलगे आहेत, त्यांपैकी धाकटा सच्चिदानंग BHS शाळेत इयत्ता 9 वी चा विद्यार्थी होता. परंतु या मुलाचं अभ्यासात अजिबात लक्ष नव्हतं, तो सतत मोबाईलवर गेम खेळत असायचा. मंगळवारी रात्री जेवताना देखील तो मोबाईलवर गेम खेळत होता, त्यावर त्याच्या वडिलांनी त्याला शिवीगाळ केली.
त्यानंतर संतापलेल्या सच्चिदानंद जेवण न करता खोलीत गेला आणि आतून कडी लावून घेतली. सकाळपर्यंत सर्व काही ठीक होईल, असे कुटुंबीयांना वाटले होते, परंतु काही भलतंच घडलं. ज्यानंतर वडिलांना पश्चाताप होतोय की, त्याने मुलाला शिव्या का दिल्या? काल जर हे घडलं नसतं, तर त्याचा मुलगा आज जिवंत असता. परंतु मुलांना देखील हे समजुन घेणं गरजेचं आहे की, त्यांचे आई-वडिल हे नेहमी त्यांच्या चंगल्याचाच विचार करत असतात. त्यामुळे आई-वडिल ओरडले म्हणून ते तुमच्यावर प्रेम करत नाहीत असा याचा अर्थ होत नाही.