सैन्यात 1.3 लाख पदांवर लवकरच भरती! 'या' पदासाठी कोण करु शकतं अर्ज, जाणून घ्या

 जर तुम्हाला पण सैन्यात भरती होण्याची इच्छा आहे, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 

Updated: Jul 27, 2022, 04:53 PM IST
सैन्यात 1.3 लाख पदांवर लवकरच भरती! 'या' पदासाठी कोण करु शकतं अर्ज, जाणून घ्या title=

Join Indian Army :  भारत मातेची सेवा करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. आजही काही घरांमध्ये घरातील एक तरी सदस्य हा सैन्यात असतो. जर तुम्हाला पण सैन्यात भरती होण्याची इच्छा आहे, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारने सशस्त्र दलांमध्ये सुमारे 1.3 लाख पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. 

नुकतेच केंद्र सरकारने भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाल दलमध्ये 1,35,850 रिक्त पदे भरण्याबाबत लोकसभेला माहिती दिली आहे. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी 22 जुलैला लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतीय लष्करांत 1,16,464 पदे, भारतीय नौदलात 13,597 पदे आणि भारतीय हवाई दलात उर्वरित 5789 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये अधिकारी, खलाशी, वायुसेना इत्यादी पदांवर नियुक्त केलं जाणार आहे.

कुठे आणि किती पदांसाठी भरती

1. भारतीय सैन्यात अधिकारी - 7,308 पदे
2. एमएनएस अधिकारी - 471 पदे 
3 कनिष्ठ आयोग अधिकारी - 1,08,685 पदे 
4. भारतीय नौदलात अधिकारी - 1446 पदे (वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय वगळता) 
5. खलाशी - 12151 पदे 
6. भारतीय हवाई दलात अधिकारी - 572 पदे 
7. एअरमन - 5217 पदे