मुंबई : अनेक ठिकाणी आधार कार्ड क्रमांक जोडणं अनिवार्य करण्यात आलंय. यासाठी आता ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढही करण्यात आलीय. अशा वेळी तुमच्या आधार क्रमांकाचा चुकीचा वापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
अशा वेळी आपल्या आधार क्रमांकाचा वापर आपल्याशिवाय इतर कुणी चुकीच्या कारणासाठी तर करत नाही ना? याची खात्री तुम्ही करून घेऊ शकता. या नवीन सुविधेचं नाव आहे 'आधार ऑथेन्टिकेशन हिस्ट्री'...
- UIEDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार सर्व्हिसेसखाली 'आधार ऑथेन्टिकेशन हिस्ट्री'वर क्लिक करा
- 'आधार ऑथेन्टिकेशन हिस्ट्री'च्या पेजवर आपला आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड एन्टर करा. यानंतर एक ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात येईल
- नव्या पेजवर ऑथेन्टिकेशन टाईप सिलेक्ट करा. डेट रेंज, नंबर ऑफ रेकॉर्डस आणि ओटीपी एन्टर करा
- हे सबमिट करताच ऑथेन्टिकेशन हिस्ट्री उघडली जाईल. यामध्ये ऑथेन्टिकेशनडेट, टाईम, टाईप, आयडी आणि रिस्पॉन्ससारखी माहिती मिळेल
- जर इतर कुणी तुमचं आधार कार्ड वापरलं असेल तर त्याची माहिती तुम्हाला इथं उपलब्ध होईल
आधार क्रमांक हा गोपनीय क्रमांक नाही आणि जर एखाद्या आधार धारकाला सरकारी कल्याण योजना किंवा इतर सरकारी सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला संलग्न अधिकृत एजन्सीजला आपला आधार क्रमांक द्यावा लागेल, असं UIEDAIनं अनेकदा स्पष्ट केलंय.
आधार निगडीत फसवेगिरीपासून सावध राहण्यासाठी आधार बायोमेट्रिक डेटा लॉक करणंही एक चांगला पर्याय ठरू शकतो.