श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये दोन जवान शहीद झाले आहेत. सर्च ऑपरेशनदरम्यान जवानांना वीरमरण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नौशेरा सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन सुरु होतं. सर्च ऑपरेशनगरम्यान गोळीबार करण्यात आला. याच गोळीबारात जवान शहीद झाले. पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या भागात अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.
Two Indian Army soldiers have lost their lives during a cordon & search operation in Nowshera sector(J&K). The operation is still in progress. Further details awaited. pic.twitter.com/yIk6GMdZzD
— ANI (@ANI) January 1, 2020
काही दिवसांपूर्वी, पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेलगत असणाऱ्या उरी सेक्टरमध्ये बेछूट गोळीबार करण्यात आला होता. यात भारतीय सैन्यदलाच्या एका अधिकाऱ्याचा आणि एका स्थानिक महिलेचा मृत्यू झाला होता. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं होतं. येथील हाजीपीर परिसरात पाकिस्तानी सैन्याकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यानंतर भारतीय सैन्याकडूनही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.