पंजाब, हरियाणामधील हिंसाचारात ५ ठार, १०० जण जखमी

 'डेरा सच्चा सौदा'चे प्रमुख बाबा राम रहीम गुरमीत सिंग याला बलात्कार प्रकरणी १५ वर्षानंतर दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर जमावाकडून तोडफोड  आणि जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात ५ जण ठार तर १०० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 25, 2017, 05:13 PM IST
पंजाब, हरियाणामधील हिंसाचारात ५ ठार, १०० जण जखमी title=

पंचकुला :  'डेरा सच्चा सौदा'चे प्रमुख बाबा राम रहीम गुरमीत सिंग याला बलात्कार प्रकरणी १५ वर्षानंतर दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर जमावाकडून तोडफोड  आणि जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात ५ जण ठार तर १०० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत.  

पंजाबमधील मुक्तसर, भटिंडा आणि मानसा येथे संचार बंदी लागू करण्यात आलेय.  पंचकुलात बाबा राम रहीम समर्थकांच्या हिंसाचारादरम्यान तिघांचा मृत्यू झालाय. संतप्त जमावाकडून जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड करण्यात येत आहे. जमावर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना अपयश आलेय. जमावाकडून दगडफेक करण्यात येत आहे. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधुरांचा वापर केला तसेच हवेत गोळीबारही केला. मात्र, जमाव अधिकच आक्रमक झाला. त्याने जाळपोळ करण्यास सुरुवात केली.

काय आहे हे प्रकरण

राम रहीम याच्यावर त्याच्या आश्रमातील दोन साध्वींवर १५ वर्षांपूर्वी बलात्कार केल्याच्या आरोपाखाली खटला सुरु आहे. या खटल्यात राम रहीम दोषी ठरविण्यात आले.  दरम्यान, गुरुमीत राम रहीम याच्यावर बलात्कारापासून खुनाचे व खुनाच्या प्रयत्नाचे आरोप आहेत. त्याने आपल्या ४०० पुरुष अनुयायांची जबरदस्तीने नसबंदी केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. आश्रमातील साध्वीसंदर्भात अनुयायांना लैंगिक आकर्षण वाटू नये, यासाठी तसे केले होते, असे सांगण्यात येते.