Flipkart बिग बिलियन सेल: 7000 रूपयांहूनही कमी किमतीत मिळणार ब्रॅंन्डेड मोबाईल

कमी किमतीत अधिक फिचर्सवाला आणि तितकाच ब्रॅंन्डेड मोबाईल खरेदी करू इच्छित असाल तर, बातमी तुमच्या कामाची आहे. Flipkart आपल्या बिग बिलियन डेज सेलला सुरूवात करत आहे. या सेलमध्ये तुम्ही कमी किमतीत ब्रॉंडेड मोबाईल खरेदी करू शकता.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 17, 2017, 03:55 PM IST
Flipkart बिग बिलियन सेल: 7000 रूपयांहूनही कमी किमतीत मिळणार ब्रॅंन्डेड मोबाईल title=

मुंबई : कमी किमतीत अधिक फिचर्सवाला आणि तितकाच ब्रॅंन्डेड मोबाईल खरेदी करू इच्छित असाल तर, बातमी तुमच्या कामाची आहे. Flipkart आपल्या बिग बिलियन डेज सेलला सुरूवात करत आहे. या सेलमध्ये तुम्ही कमी किमतीत ब्रॅंन्डेड मोबाईल खरेदी करू शकता.

Flipkartफ्लिपकार्टचा बिग बिलियन सेल २० सप्टेंबरला सुरू होईल आणि तो २४ सप्टेबर पर्यंत सुरू राहील. तर, स्मार्टफोन सेल २१ सप्टेबर पासून सुरू होईल. सेलकाळात ऑनलाईन बुकींग करून खरेदी केल्या जाणाऱ्या स्मार्टफोनची किंमत बाजारपेठेतील सध्याच्या किमतीपेक्षा कितीतरी पटीने कमी असणार आहे. यात मोटोरोला, सॅमसंग, जोलो, स्वाईप, अॅसूस, मायक्रोमॅक्स, आयमुव्ही, सॅन्सूई यांसारख्या ब्रॉंडचे स्मार्टफोन उपलब्ध असतील. यातील काही मोबाईलची किंमत ७,०००रूपयांपेक्षाही कमी असणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, Flipkartसेल दरम्यान, Infinix Hot 4 Pro वर १,००० रूपयांची सूट मिळेल.हा हॅंडसेट सेलमध्ये केवळ ६,४९९ रूपयांना मिळेल. तर याच किमतीतला (६,४९९)) पॅनेसोनिकचा हॅंडसेटही (पी८५) सेलमध्ये केवळ ४,९९९ रूपयांना मिळेल. स्वाईप एलीट सेन्सची किंमत ५,९९९ रूपये इतकी असेल. बाजारात हाच मोबाईल ७,९९९ रूपयांना विकाल जात असल्याची माहिती आहे.  Xolo Era 1X तर 3,999 रुपयांमध्ये विकला जाण्याची शक्यात आहे. याच मोबाईलची बाजारातली सध्याची किंमत ४,९९९ रूपये इतकी आहे.

दरम्यान, इतरही अनेक ब्रॅंन्डचे स्मार्टफोन स्वस्त दरात मिळणार आहेत.