Flipkart Big Saving Days: स्मार्टफोन्सवर २० हजारांपर्यंत सूट

२३ जून ते २७ जून या दरम्यान 'BIG SAVING DAYS' सेल सुरू होणार आहे.   

Updated: Jun 21, 2020, 02:52 PM IST
Flipkart Big Saving Days: स्मार्टफोन्सवर २० हजारांपर्यंत सूट

नवी दिल्ली : फ्लिपकार्डवर पुन्हा एकदा Flipkart Big Saving Days ऑफर सुरू होणार आहे. देशातली सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंग कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लिपकार्डवर २३ जून ते २७ जून या दरम्यान 'BIG SAVING DAYS' सेल सुरू होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना घर बसल्या आणि किंमतीत वस्तू विकत घेता येणार आहेत. शिवाय एचडीएफीसी बँक कार्ड्स आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर १० टक्के तात्काळ डिस्काउंट दिला जाणार आहे. 

त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड आणि ईएमआय वरून कमीतकमी ४ हजार ९९९ रूपयांची खरेदी केल्यास १ हजार ५०० रूपयांपर्यत सूट मिळणार असून डेबिट कार्डवरून खरेदी केल्यास  ५०० रुपयांपर्यंत  डिस्काउंट मिळणार आहे. सुपर सेव्हिंग ऑफर्स अंतर्गत मोबाइल आणि टॅबलेट वर जबरदस्त ऑफर्स दिले जात आहे. 

आयफोन ७ प्लस ३७ हजार ९०० रुपया ऐवजी ३४ हजार ९९९ रुपयांमध्ये ग्राहकांना विकत घेता येणार आहे. स्मार्टफोनवर नो कॉस्ट ईएमाय, कार्डलेस क्रेडिट आणि एक्सचेंज ऑफर सुद्धा देण्यात येत आहे. टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनावर सुद्धा या फ्लिपकार्ट सेलमध्ये एक्सचेंज ऑफर मध्ये खरेदी करण्याची संधी आहे.
 
हेडफोन आणि स्पीकर्सवर  ६० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. स्मार्टवॉच आणि बँड्सवर ६० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. शिवाय लॅपटॅपवर देखील ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.