माजी क्रिकेटर चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन

यूपी सरकारमधील आमदार चेतन चौहान 

Updated: Aug 16, 2020, 05:55 PM IST
माजी क्रिकेटर चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन  title=

मुंबई : माजी क्रिकेटर आणि कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मेदांता रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू होते. तब्बेत खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. गेल्या काही तासांपासून त्यांच्या तब्बेतीमध्ये काहीही सुधारणा नव्हती. 

कोरोनामुळे चेतन चौहान यांच्या किडनीमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढले होते. शनिवारी संध्याकाळी चेतन यांना लखनऊच्या पीजीआयमधून मेदांता गुरूग्राममध्ये आणण्यात आले होते. डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत होते.

गेल्या महिन्यात चेतन चौहान यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. किडनीमध्ये कोरोनाचे विषाणू गेल्यामुळे शनिवारी त्यांची तब्बेत अचानक बिघडली. भारतीय संघाचे फलंदाज असलेले चेतन चौहान अमरोहा जिल्ह्यातील नौगांवा विधानसभेतील आमदार होते. 

क्रिकेटमधून निवृत्त होऊन ते राजकारणात सक्रीय झाले होते. सध्या ते योगी सरकारमध्ये कार्यरत होते.