यमुना एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू 4 जण जखमी

यमुना एक्सप्रेस-वेवर मंगळवारी पहाटे 5 वजता भीषण अपघात झाला. अपघातात 7 जण मृत्यूमुखी पडले असून 4 जण गंभीर जखमी आहे. 

Updated: Feb 19, 2019, 10:49 AM IST
यमुना एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू 4 जण जखमी title=

नवी दिल्ली : यमुना एक्सप्रेस-वेवर मंगळवारी पहाटे 5 वजता भीषण अपघात झाला. अपघातात 7 जण मृत्यूमुखी पडले असून 4 जण गंभीर जखमी आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अपघात स्टोन-138 जवळ झाला आहे. हायवे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. वाहन चालकाला झोप आल्यामुळे त्याचे गाडीवरचे नियंत्रण सूटले आणि ही दुर्घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

बलदेव भागातील बुर्ज सुखदेव गावात भरधाव वेगात येत असलेल्या रूग्णवाहिकेने आयटेन कारला जोरदार धडक दिल्यामुळे अपघात झाला. प्रत्यक्षदर्शिंनी सांगितल्याप्रमाणे रूग्णवाहिका एका मृतदेहाला नोएडा कडून बिहारच्या दिशेने घेवून जात असताना समोरून यणाऱ्या दोन गाड्यांना धडक दिल्यामुळे दुर्घटना घडली. अपघातानंतर रूग्णवाहिका आणि कारला क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले असून मृतांना शवविच्छेदनासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.