Funny Couple Video: प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं, असं म्हणतात. प्रेमासाठी कधी कोण काय करेल सांगता येत नाही. अनेकदा सोशल मीडियावर (Social Media Viral Video) अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून हसू देखील आवरत नाही. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्का देखील बसतो, अशातच आता सोशल मीडियावर व्हायरल (Trending Video Of Couple) होत असलेला व्हिडीओ पाहून अनेकांनी डोक्यावर हात ठेवला आहे.
गाडीवरून फिरायला चाललेल्या कपचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरता आलं नाही आणि अशी गर्लफ्रेंड (Girlfriend) नको रे बाबा, असं नेटकरी म्हणाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आहे तरी काय हे जाणून घेऊया...
वायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कपल बाइक बसून फिरायला जात आहे. फिरायला जात असताना मागे बसलेली गर्लफ्रेंड ब्लॉग व्हिडीओ बनवून बिजी होते. ती ब्लॉग करत असताना बिझी होते आणि बॉयफ्रेंडला (BoyFriend) देखील कॅमेऱ्यामध्ये बघायला लावते. बिचारा बॉयफ्रेंड गाडी चालवता चालवता कॅमेऱ्यात (Video Blogging) बघण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात...
दरम्यान, समोरून काहीतरी आल्यानं बॉयफ्रेंडला गाडी आवरली नाही आणि तो नजरचुकीमुळे अपघाताचा (Couple Accident) शिकार झाला. त्यावेळी गर्लफ्रेंड देखील पडली. विषय इतक्यात संपला नाही. गाडीवरून पडल्यानंतर देखील मुलगी केस आवरत तिचा ब्लॉग व्हिडीओ सुरूच ठेवते. तर बॉयफ्रेंड खड्ड्यात पडल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ अनेकजण एकमेकांना शेअर करून सल्ले देताना दिसत आहेत.