'गौरी लंकेश यांचे मारेकरी उजव्या विचारसरणीचे किंवा नक्षलवादी'

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला राजकीय रंग देऊ नये असं आवाहन गौरी लंकेश यांच्या कुटुंबियांनी केलंय.

Updated: Sep 7, 2017, 09:48 PM IST
'गौरी लंकेश यांचे मारेकरी उजव्या विचारसरणीचे किंवा नक्षलवादी' title=

बंगळुरू : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला राजकीय रंग देऊ नये असं आवाहन गौरी लंकेश यांच्या कुटुंबियांनी केलंय. याबाबत त्यांनी एक याचिकाही तयार केली आहे. एक पत्रकार म्हणून, एक महिला म्हणून आपल्या बहिणीला न्याय मिळावा अशी विनंती गौरी लंकेश यांचा भाऊ इंद्रजित लंकेश यांनी केलीय.

आपल्या बहिणीची हत्या नक्षलवादी किंवा उजव्या विचारसरणीच्या व्यक्तींनी केली असल्याचा संशयही गौरी यांच्या भावानं व्यक्त केलाय. याखेरीज गौरी लंकेश यांच्यामागे सा-या पत्रकारांनी उभं राहिलं पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

कृपया तिच्या मृत्यूचा राजकीय फायद्यासाठी वापर करु नये. तिच्या मृत्यूला कोणताही राजकीय रंग देऊ नये. तुम्हाला वाटलं तर विचारधारेचा रंग देऊ शकता. कारण ती तिच्या विचारधारेवर ठाम असायची असदेखील इंद्रजित लंकेश यांनी सांगितलं.