लांब केसांमुळे चर्चेत आली ही तरुणी, गिनीज बुकमध्ये नोंद

जगात सर्वात लांब केस असल्याचा रेकॉर्ड

Updated: Dec 26, 2018, 01:40 PM IST
लांब केसांमुळे चर्चेत आली ही तरुणी, गिनीज बुकमध्ये नोंद title=

मुंबई : गुजरातच्या अरवल्ली जिल्ह्यातील मोडासामध्ये राहणारी नीलांशी पटेल सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. तिचं चर्चेत येण्यामागचं कारण आहे तीचे लांब केस. यासाठी तिचं नाव गिनीज बुकमध्ये देखील नोंदवलं गेलं आहे. ११ वी मध्ये शिकत असलेली नीलांशीने जगात सर्वात लांब केस असल्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. इटलीच्या रोममध्ये गिनीज बुकचे जज यांनी नीलांशीला सन्मानित केलं. नीलांशीचे केसं 170.5 सेमी (5 फूट, 7 इंच) लांब आहेत.

याआधी हा रेकॉर्ड अर्जेंटीनाच्या ऐब्रिल लॉरेनजटीच्या नावावर होता. तिचे केस 152.5 सेमी लांब होते. यानंतर हा रेकॉर्ड 17 वर्षाच्या किटो कवाहराने तोडला. तिचे केस 155.5 सेमी लांब होते. यानंतर आता नीलांशीने 15 सेमीच्या अंतराने हा रेकॉर्ड मोडला आहे.

Image result for nilanshi long hair

नीलांशी म्हणते की, 'जेव्हा ती 6 वर्षाची होती तेव्हा एका ब्यूटिशियनने तिचे केस बारीक कापले होते. यानंतर तिने कधीच तिचे केस नाही कापले. माझ्या कुटुंबाने देखील माझा हा निर्णय मान्य केला. आता मी याला माझा लकी चार्म मानते.' 

नीलांशी म्हणते की, या रेकॉर्डमुळे तिला फोटोशूटसाठी आता अनेक फोन येत आहेत. पण सध्या ती फोकस जेईईसाठी करत आहे. नीलांशीला कंप्यूटर किंवा आयटी इंजिनिअर व्हायचं आहे. नीलांशीचे वडील म्हणतात की, 'आम्ही कधीच तिच्या केसांवर लक्ष दिलं नाही. पण एकदा जेव्हा गोव्याला फिरायला गेलो तेव्हा तेथे अनेक परदेशी पर्य़टकांनी तिच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा दर्शवली. यानंतर मी या रेकॉर्डसाठी सर्च करणं सुरु केलं आणि अर्ज केला.