Video Viral : कोचिंग सेंटरच्या बाहेर मुली एकमेकांना भिडल्यात, जोरदार मारपीट

Girls Fight Video Viral : मुली कोचिंग सेंटरसमोर एकमेकांना भिडताना दिसत आहेत.

Updated: Jul 12, 2021, 01:41 PM IST
Video Viral : कोचिंग सेंटरच्या बाहेर मुली एकमेकांना भिडल्यात, जोरदार मारपीट title=

मुंबई : Girls Fight Video Viral :  तुम्ही रस्त्यावर मुलांचे भांडण पाहिले असतीलच पण मुलींनी कधी सार्वजनिक ठिकाणी भांडताना पाहिले आहे का? आपण पाहिले नसेल तर हा व्हायरल होणारा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला धक्का बसेल. व्हिडिओमधील मुली कोचिंग सेंटरसमोर एकमेकांना भिडताना दिसत आहेत.

मारामारीचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत क्लास बाहेर दोन मुली एकमेकिंच्या झिंज्या पकडताना दिसत आहेत. आधी तीन मुलींमध्ये भांडण सुरू होते आणि नंतर दोन मुली जोरदारपणे एकमेकांना लाथा बुक्या मारताना दिसून येत आहे. त्याचवेळी दोघींनी केस ओढण्याचा प्रयत्न केल्याचा दिसून येत आहे.

या मारामरीच्यावेळी दोघीही लाथ आणि हाताचे ठोसे लगावताना दिसून येत आहेत. या मुलींचे भांडण सुरु असताना तेथे अनेक विद्यार्थी देखील आजूबाजूला उभे आहेत. परंतु त्यांच्यातील एकही जण हे भांडण सोडविण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच ते दोघींची एकमेकांपासून सुटका करण्याचा प्रयत्न करीत नाही.

हा व्हिडिओ इंस्टावर satu_saini नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला टीव्ही शो महाभारतचा साउंडट्रॅक मारामारीच्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आला आहे.

व्हिडिओ पाहा-

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sa Tu SaiNi (@satu_saini90)

या व्हिडिओला 12 हजाराहून अधिक लाईक मिळाले आहे. लोक काही कमेंट्स करतत ​​आहेत आणि विचारत आहेत की यापैकी कोण जिंकले…