Go Airlines IPO | पुन्हा दमदार आयपीओ मार्केटमध्ये येण्याच्या तयारीत; SEBI ने दिली मंजूरी

देशातील बजट एअरलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गो एअरलाईनला 3600 कोटींच्या IPO साठी SEBI ने मंजूरी दिली आहे.

Updated: Aug 31, 2021, 07:47 AM IST
Go Airlines IPO | पुन्हा दमदार आयपीओ मार्केटमध्ये येण्याच्या तयारीत; SEBI ने दिली मंजूरी title=

मुंबई : देशातील बजट एअरलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गो एअरलाईनला 3600 कोटींच्या IPO साठी SEBI ने मंजूरी दिली आहे. गो एअरलाईनने स्वतःला 'गो फर्स्ट' (GO First)म्हणून रिब्रॅंड केले आहे.

ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP)च्या मते गो एअरलाईनच्या शेअर्समध्यमातून 3600 कोटी रुपये उभारण्याची योजना बनवण्यात आली आहे. प्री-आयपीओ प्लेसमेंटच्या माध्यमातून 1500 कोटी रुपये उभारण्याची नियोजन आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  गो एअरलाईन्सने मे महिन्यात IPO साठी सेबीकडे कागदपत्र दाखल केले होते. ज्यावर 26 ऑगस्टला ऑब्जर्वेशन मिळाले. 27 ऑगस्टला माहिती अपडेट केली गेली. ज्यानंतर सोमवारी ही माहिती सार्वजनिक करण्यात आली.

आयपीओचा उद्देश
कागदपत्रांच्या माहितीनुसार आयपीओतून होणाऱ्या उत्पन्नातून एअरलाईन 2015.81 कोटीहून अधिक रुपयांचा उपयोग आपले कर्ज आणि इतर देयकं फेडण्यासाटी करणार आहे. 279 कोटी रुपयांचा उपयोग लेटर ऑफ क्रेडिटच्या रिप्लेसमेंटसाठी करणार आहे. 

भागीदारी
गो एअरलाईन्समध्ये वाडिया ग्रुपजवळ 73.33 टक्के भागीदारी आहे. इश्युच्या ग्लोबल कॉर्डिनेटर आणि बुक रनिमग लीड मॅनेजरमध्ये ICICIC Securities, Citi आणि मॉर्गन स्टेनली आहेत.

सध्या शेअर बाजारात इंडिगो, स्पाइसजेट आणि जेट एअरवेज या तीन कंपन्या आधीपासून लिस्टेड आहेत.