टेकऑफ होताच फेल झाले विमानाचे इंजिन

लेहमध्ये शनिवारी मोठा विमान अपघात होता होता टळला. मिळालेल्या माहितीनुसार, गोएअरचे विमान टेकऑफ होताच विमानाचे इंजिन फेल झाले ज्यामुळे विमानाची इर्मजन्सी लँडिंग करावे लागले.

Updated: Feb 24, 2018, 11:44 AM IST
टेकऑफ होताच फेल झाले विमानाचे इंजिन title=

नवी दिल्ली : लेहमध्ये शनिवारी मोठा विमान अपघात होता होता टळला. मिळालेल्या माहितीनुसार, गोएअरचे विमान टेकऑफ होताच विमानाचे इंजिन फेल झाले ज्यामुळे विमानाची इर्मजन्सी लँडिंग करावे लागले.

या विमानात १०० प्रवासी प्रवास करत होते. मात्र वैमानिकाच्या सतर्कतेमुळे विमानातील प्रवाशांचे प्राण वाचले. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी गो एअरचे विमाना एअरबस ३२० निओ ११२ने प्रवाशांसह सकाळी ९.२० वाजता टेकऑफ केले. मात्र टेकऑफ होताच विमानाचे एक इंजिन बंद पडले. 

यावेळी वैमानिकाने सतर्कता बाळगताना विमानाचे इर्मजन्सी लँडिग करण्याचा निर्णय घेतला. त्याने एअऱ ट्रॅफिक कंट्रोल रुमला याची माहिती दिली. त्यानंतर लगेचच ९.३० मिनिटांनी मोठ्या सावधानतेने विमानाचे लँडिंग करण्यात आले. 

विमानाचे टेकऑफ होण्याआधी नेहमी विमानाची तपासणी केली जाते. दरम्यान ही घटना का घडली याचा तपास केला जात आहे.