नवी दिल्ली : सोन्याचा भाव आज चौथ्या दिवशी ही कमी झाला आहे. मागील ३ दिवसात सोन्याच्या दरात २३० रुपयांची घट झाली आहे. आज सोन्याचा भाव ३० रुपयांनी कमी झाला आहे. आज सोनं ३४००० रुपये प्रति १० ग्रॅम झालं आहे. दुसरीकडे चांदी देखील स्वस्त झाली आहे. चांदीचा भाव १५० रुपयांनी कमी झाली आहे. आज चांदी ४०,६५० रुपये प्रति किलो झाली आहे. चांदीची मागणी कमी झाली आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोनं महागलं आहे. न्यूयॉर्कमध्ये सोनं ०.१८ टक्क्यांनी वाढला आहे. न्यूयॉर्कमध्ये सोनं १३०९.२० डॉलर प्रति औंस आणि चांदी ०.५२ टक्क्यांनी वाढून १५.७१ डॉलर प्रति औंस झाली आहे.
स्थानिक बाजारात ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्ध सोनं ५० रुपयांनी कमी होत अनुक्रमे ३४००० आणि ३३८५० रुपये झालं आहे. सोमवारी सोनं ५५ रुपयांनी आणि मंगळवारी १४५ रुपयांनी स्वस्त झालं होतं. बुधवारी सोनं ३० रुपयांनी स्वस्त झालं होतं.