२०१९ मध्ये सोनं ३५ हजारांच्या वर पोहोचणार?

सोन्याचे भाव आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणार ?

शैलेश मुसळे | Updated: Dec 30, 2018, 01:08 PM IST
२०१९ मध्ये सोनं ३५ हजारांच्या वर पोहोचणार? title=

मुंबई : २०१९ या नवीन वर्षात सोनं अनेकांसाठी शुभ ठरु शकतं असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहेय. २०१९ मध्ये सोनं ३५००० हजार प्रति तोळा जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. नवीन वर्षात सोनं खरेदी करण्यासाठी योग्य वेळ कोणती? याबाबत देखील तज्ज्ञांनी मतं मांडली आहेत. २०१८ हे वर्ष सोन्यासाठी कसं होतं? २०१९ हे वर्ष सोन्यासाठी कसं असणार आहे?. लग्नाचे मुहुर्त अधिक असल्याने याचा सोन्यावर परिणाम होणार का ? वाचा सविस्तर

२०१९ मध्ये लग्नाचे ११३ मुहुर्त

मुंबई ज्‍वेलर्स असोसिएशनच्या व्हॉईस प्रेसिडेंट कुमार जयंत यांनी म्हटलं की, २०१६ च्या नोटबंदीनंतर २०१७ मध्ये जीएसटी लागू झाला. त्या दरम्यान सोनं २७००० हजार रुपये होतं. २ वर्षात लोकांनी सोनं जास्त खरेदी केलं नाही पण आता सोन्यामध्ये गुंतवणूक आता वाढली आहे. यावर्षी धनत्रयोदशीला सोनं ३२,८०० वर पोहोचलं. त्यातच २०१९ मध्ये लग्नाचे ११३ मुहुर्त आहेत त्यामुळे सोन्याची मागणी वाढणार आहे. येणाऱ्या ३ महिन्यात सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊ शकते.

सोन्यासाठी मागील ५ वर्ष खराब

मोतीलाल ओस्‍वाल कमोडिटीचे किशोर नारने यांच्या मते, मागील ५ वर्ष सोन्यासाठी इतके चांगले नव्हते. कमोडिटी मार्केटमध्ये चांगलं रिटर्न मिळत होतं. पण गोल्‍डमध्ये गुंतवणूक करुन कोणाला मोठं नुकसानही नाही झालं. २०१९ मध्ये चीन आणि अमेरिका यांच्यात ट्रेडवॉर होणार असल्यानं सोन्याची मागणी कमी होऊ शकते. २ वर्षात चांगले रिटर्न मिळू शकतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या मागणीत घट 

क्‍वांटम AMC चे सीनियर फंड मॅनेजर चिराग मेहता यांनी म्हटलं की, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या मागणीत घट होण्याची शक्यता आहे. पण भारतात याची मागणी वाढणार आहे. कारण याचं सर्वात मोठं कारण आंतरराष्ट्रीय अर्थव्‍यवस्‍थेतील घसरण असेल. य़ामुळे लोकं वस्तूमध्ये गुंतवणूक करतील.

कसा होता २०१८

> १ जानेवारी २०१८ ला सोन्याचा भाव २९१०० रुपये प्रति १० ग्रॅम होता.
> यावर्षी सोन्यामधून ७ टक्के रिटर्न आले.
> सध्या सोन्याचा भाव ३१५० च्या दरम्यान सुरु आहे. 
> २०१४ मध्ये सोन्याच्या गुंतवणुकीतून ५ टक्के रिटर्न मिळाले होते.
> २०१५ मध्ये मात्र सोन्याचे भाव पडल्याने - ७ टक्के नुकसान झालं होतं.
> २०१६ मध्ये सोन्यातून सर्वाधिक १० टक्के रिटर्न मिळाले.
> २०१७ मध्ये सोन्यातून ५.५ टक्के रिटर्न मिळाले.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x