मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. तुम्ही जर सोने खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही सुवर्ण संधी आहे. आज सोन्याच्या दरात 300 रूपयांनी घट झाली आहे. आज सोने खरेदी करण्यासाठी जवळपास 47 हजार 620 रूपये मोजावे लागत आहेत. गेल्या सोमवारी सोन्याचे दर 320 रूपयांनी वधारले होते.
गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर
वार सोन्याचे दर
सोमवार 47 हजार 299
मंगळवार 47 हजार 684
बुधवार 47 हजार 910
गुरूवार 47 हजार 721
शुक्रवार 47 हजार 923
सोन्यासोबतचं चांदीचे दर देखील घसरले आहेत. चांदीच्या दरात 450 रूपयांची घट झाली आहे. चांदीचे दर पुन्हा एकदा 69 हजार रूपयांपेक्षा खाली आले आहेत. सध्या चांदी 68 हजार 860 रूपयांवर ट्रे़ड करत आहे. गेल्या सोमवारी चांदीचे दर 70 हजार रूपयांवर होते.
गेल्या आठवड्यातील चांदीचे दर
वार चांदीचे दर
सोमवार 70 हजार 39
मंगळवार 69 हजार 512
बुधवार 69 हजार 365
गुरूवार 68 हजार 962
शुक्रवार 69 हजार 297