महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदी महागलं; वाचा 10 ग्रॅमचा भाव

Gold Price Today In Marathi: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मागील आठवड्यात सोनं घसरले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा सोनं वधारलं आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 1, 2024, 11:19 AM IST
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदी महागलं; वाचा 10 ग्रॅमचा भाव  title=
Gold Price Today 1st august 22kt 24kt gold rates in india

Gold Price Today In Marathi: मागच्या आठवड्यात निच्चांकी घसरणीनंतर मौल्यवान धातूचे भाव पुन्हा एकदा वधारले आहेत. आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदीचे भाव वाढले आहेत. आज भारतीय वायदे बाजारात सोनं एका झटक्यात 600 रुपयांच्या जवळपास महागले आहे. तर, चांदीदेखील 500 रुपयांपेक्षा अधिक महाग झाले आहे. त्यामुळं पुन्हा एकदा खरेदीदारांचा हिरमोड झाला आहे. 

अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यानंतर मागील आठवड्यात सोन्याचे भाव चांगलेच कोसळले होते. एकाच आठवड्यात सोनं 5 हजारांनी स्वस्त झालं होतं. मात्र, या आठवड्यात सोमवारपासूनच सोनं महागलं आहे. आजही मौल्यवान धातूच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याचे दर 70 हजार 360 वर स्थिरावले आहे. तर, चांदी यावेळी 564 रुपयांनी वाढून 84,160 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. मागील सत्रात चांदी 83,596 रुपयांवर स्थिरावली होती. 

असा आहे सोन्याचे दर

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  64, 500 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  70, 360 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   52, 780  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 450 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 036 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 278  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   51, 600 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   56, 288  रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    52, 780  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 64, 500 रुपये 
24 कॅरेट- 70, 360  रुपये
18 कॅरेट- 52, 780  रुपये