दागिने खरेदी करणे महागले; सोनं वधारलं, वाचा आजचा प्रतितोळ्याचा भाव

Gold Price Today In Marathi: ऑगस्ट महिना सुरू होताच सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 2, 2024, 11:47 AM IST
दागिने खरेदी करणे महागले; सोनं वधारलं, वाचा आजचा प्रतितोळ्याचा भाव title=
Gold Price Today 2nd august 22kt 24kt gold rates rise in india

Gold Price Today In Marathi: सोनं खरेदी करणं आता पुन्हा एकदा महागलं आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र, या आठवड्यात मौल्यवान धातुमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. तर, सोन्याचे भाव चांगलेच वधारले आहेत. भारतीय वायदे बाजारात सोनं पुन्हा एकदा मजबूत झालं आहे. 2 ऑगस्ट रोजी सोनं 330 रुपयांनी वाढलं असून आज सोनं 70 हजारांच्या पार गेलं आहे. तर, चांदीलादेखील झळाळी आली आहे. आज चांदी 83,500 रुपयांवर स्थिरावली आहे. 

स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांने वधारून 2,451 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. यूएस गोल्ड फ्युचर्स 0.6 टक्क्यांने वाढून 2,495 टक्क्यांवर स्थिरावले होते. सोन्याच्या दरवाढीमागे अनेक कारणे आहेत. सप्टेंबरमध्ये व्याजदरात कपात करण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, मिडल ईस्टमध्ये वाढत्या तणावामुळं सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळते. अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीनंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढू लागल्याने ग्राहक चिंतेत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत सोनं वधारल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव आहेत. 

असा आहे सोन्याचे दर

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  64, 800 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  70, 690 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   53, 020  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 480 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 069 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 302  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   51, 480 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   56, 552  रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    42, 416  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 64,800 रुपये 
24 कॅरेट- 70,690  रुपये
18 कॅरेट- 53, 020  रुपये