ग्राहकांना किंचित दिलासा; उच्चांक दरवाढीनंतर आज सोने झाले स्वस्त, जाणून घ्या भाव!

Gold Price Today On 22nd May: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 22, 2024, 12:39 PM IST
ग्राहकांना किंचित दिलासा; उच्चांक दरवाढीनंतर आज सोने झाले स्वस्त, जाणून घ्या भाव! title=
Gold Price Today on 22nd may 2024 gold and silver slip know the latest rate

Gold Price Today On 22nd May: उच्चांक दरवाढीनंतर सोन्याच्या वाढक्या किंमतींना ब्रेक लागला आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाल्याचे समोर आले आहे. भारतीय वायदे बाजारात सोनं 191 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर, सध्या 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 73,830 इतके आहेत. मागील सत्रात सोन्याचा दर 74,021 वर बंद झाला होता. चांदीच्या दरात आज 466 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर सध्या चांदी 94,259वर ट्रेड होत आहे. काल चांदीची किंमत 94,725 इतकी होती. 

भारतीय सराफा बाजारांसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतेय. इतकंच नव्हे तर बेस मेटल्समध्ये असलेली तेजी देखील थोडी कमी झाल्याचे दिसत आहे. डॉलर मजबूत झाल्यानंतर सोन्याच्या दरात थोडी घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. डॉलरचा भाव 2400 च्या आसपास आहे. स्पॉट गोल्डमध्ये 0.15 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. तर, एकीकडे यूएस गोल्ड फ्युचर 0.5 टक्के घसरणीसोबतच 2,425 डॉलर इतके होते.

सोमवारी सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाली होती. तर, चांदीचाही भाव वधारला होता. त्यामुळं सोनं आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातंय का अशी शक्यता होती. सोन्याने 75 हजारांपर्यंतचा भाव गाठला होता. मात्र, आता सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसांपासून घट होत आहे. 

22 व 24 कॅरेट सोन्याचे दर काय?

22 कॅरेट सोन्याचे दर 1 ग्रॅमसाठी 6,829 रुपये इतके आहेत. तर, 24 कॅरेट 1 ग्रॅमसाठी 7,450 रुपये इतके आहेत. 

सोन्याचे दर कसे असतील

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट   68,3852 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  73,830  रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   55, 880 रुपये