Gold Rate Today In Marathi: अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात मोठी घसरण झाली होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सराफा बाजारात सोन्याचे भाव वधारले आहेत. बुधवारी 31 जुलै रोजी पुन्हा एकदा मौल्यवान धातुच्या भावात तेजी आली आहे. सोन्याच्या दरात आज तब्बल 870 रुपयांची वाढ झाली असून 24 कॅरेट प्रतितोळा सोनं 69,820 वर स्थिरावले आहेत. तर त्याचवेळी चांदी 584 रुपयांनी वाढून 83,243 रुपये प्रतिकिलोग्रॅमवर स्थिरावली आहे. मागील आठवड्यात सोनं-चांदी तब्बल चार ते पाच हजारांनी स्वस्त झालं आहे. मात्र या आठवड्यात तीन दिवसांतच पुन्हा सोनं वधारलं आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कल यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मंगळवारीदेखील सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर, आजदेखील सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे चित्र आहे. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 69,820 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,000 रुपयांवर स्थिरावली आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 800 रुपयांनी वाढली आहे. मौल्यवान धातुच्या किंमतीत घट झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा किंमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 64, 000 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 69, 820 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 52,370 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6, 400 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 6, 982 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 237 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 51, 200 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 55, 856 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 52, 370 रुपये
22 कॅरेट- 64, 000 रुपये
24 कॅरेट- 69, 820 रुपये
18 कॅरेट- 52, 370 रुपये