Gold Silver Price Today : सण-उत्सवात सोने खरेदी (gold price) करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. मात्र आज सोने चांगलेच महागले आहेत. सोन्याच्या दराने आत्ता पर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले असून सोन्याच्या दरांनी आठवडाभरात मोठी झेप घेतली आहे. परिणामी गुंतवणूकदारांचा खिसा गरम झाला आहे. महिन्याभरात सोन्याचे दराने नवा उच्चांक गाठले आहे.
आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 55,300 रुपये असून मागील ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 53,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंदी झाली होती. तर गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार चांदी 72,100 रुपेय प्रति किलोने विकली जात आहे.
वाचा: पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर; जाणून घ्या दिल्लीपासून मुंबईपर्यंत काय आहे तुमच्या शहरातील भाव?
मुंबईत (mumbai gold price) 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 55,300 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,320 प्रति 10 ग्रॅम आहे. तर पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 55,300 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,320 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 55,300 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,320 रुपये इतका असेल, नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 55,330 आहे तप प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 60,320 रुपये आहे. तर चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 721 रुपये आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मात्र, सोन्या-चांदीच्या दरात एकाच वेळी 1000 रुपयांहून अधिक वाढ होण्याची ही वर्षभरातील पहिलीच वेळ आहे. गेल्या आठवड्यात दोन-तीन दिवस सोन्या -चांदीच दर घसरले होते. मात्र आताही येत्या काही दिवसांत दर कमी होण्याची शक्यता तज्ञ्जांकडून व्यक्त केली जात आहे.
- 22 कॅरेट स्टैंडर्ड सोने 1 ग्रॅम - 5,623 रु
- 22 कॅरेट स्टैंडर्ड सोने 8 ग्रॅम - 44,984 रु
- 22 कॅरेट स्टैंडर्ड सोने 10 ग्रॅम - 56,230 रु
- 24 कॅरेट शुद्ध सोने 1 ग्रॅम - 5,904 रु
- 24 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - 47,232 रु
- 24 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - 59,040 रु
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.