लग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात मोठी घट

शुक्रवारी सोन्याच्या दरात यंदात्या वर्षातील सर्वात मोठी घट झाल्याचं पहायला मिळालं. लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी घट झाली आहे.

Sunil Desale Updated: Mar 30, 2018, 10:17 PM IST
लग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात मोठी घट title=
Representative Image

मुंबई : शुक्रवारी सोन्याच्या दरात यंदात्या वर्षातील सर्वात मोठी घट झाल्याचं पहायला मिळालं. लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी घट झाली आहे.

सोन्याच्या दरात घसरण

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.

पाहा किती आहे सोन्याचा दर

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत ६५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ३१,३०० रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीचा दरही घसरला

सोन्याच्या किंमतीत घट झाली असताना चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात ६०० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ३९,१५० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात ६५०-६५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: ३१,३०० रुपये आणि ३०,१५० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.