Gold Rate | लग्नसराईत स्वस्तात सोनं खरेदीची संधी; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: https://ibjarates.com ने जारी केलेल्या दरानुसार, गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 51264 रुपये प्रति 10ग्रॅमवर ​​घसरला आहे. बुधवारच्या तुलनेत सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 485 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

Updated: Apr 28, 2022, 03:46 PM IST
Gold Rate | लग्नसराईत स्वस्तात सोनं खरेदीची संधी; जाणून घ्या आजचे दर title=

मुंबई : Gold Price Today :  लग्नसराईच्या दिवसांमध्ये तुम्हीही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्यात गुंतवणूक करण्याची तुम्हाला चांगली संधी आहे. गुरुवारी एमसीएक्स आणि सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. सकाळी एमसीएक्सवर सोन्याचा भाव 51 हजार रुपयांच्या खाली पोहोचला होता.

सोने 485 रुपयांनी घसरण

https://ibjarates.com ने जारी केलेल्या दरानुसार, गुरुवारी 24 कॅरेट सोने 51264 रुपये प्रति 10ग्रॅमवर ​​घसरले आहे. बुधवारच्या तुलनेत सोन्याचे दर 485 रुपयांनी स्वस्त होत आहेत. त्याच वेळी 22 कॅरेट सोने 483 रुपयांनी स्वस्त होऊन 51,059 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर 53650 रुपये प्रति तोळे इतके होते.

चांदीच्या दरांमध्ये घसरण

mcx वर चांदीचे दर आज 64796 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होते. सराफा 66900 रुपये प्रति किलो इतके झाले आहे. 

सोन्या-चांदीच्या किमतीही याप्रमाणे तपासा

सोन्या-चांदीचे दरही तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर 8955664433 वर मिस कॉल करावा लागेल. यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही अद्यावत दर पाहू शकता