IT sector news | कर्मचाऱ्यांच्या सोडून जाण्यामुळे कंपन्या हैराण; पगारात करणार भरघोस वाढ

देशातील आयटी उद्योगात कर्मचाऱ्यांच्या गळतीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस यांसारख्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा कंपनी सोडण्याचा दर 17 ते 28 टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्यामुळे कंपन्या कर्मचाऱ्यांना चांगील पगारवाढ देणार आहेत.

Updated: Apr 28, 2022, 03:05 PM IST
IT sector news | कर्मचाऱ्यांच्या सोडून जाण्यामुळे कंपन्या हैराण; पगारात करणार भरघोस वाढ title=

बेंगळुरू: आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात आठ ते दहा टक्क्यांनी वाढ करू शकतात.

या कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांच्या गळतीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस यांसारख्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा सोडून जाण्याचा दर 17 ते 28 टक्क्यांच्या दरम्यान आहे. हे कमी करण्यासाठी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पगारात आठ ते दहा टक्के वाढ होऊ शकते. गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असली तरी ती अलीकडच्या 2-3 वर्षांपेक्षा जास्त आहे.

इतर अनेक तज्ज्ञांचेही असेच मत आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीजचे मुख्य HR अप्पाराव व्हीव्ही यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की कंपनी जुलैपासून पगार वाढवू शकते. गेल्या वर्षी 7-8 टक्क्यांनी वाढ झाली होती आणि यंदाही तेवढीच वाढ होऊ शकते.

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने गेल्या वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सहा ते आठ टक्क्यांनी वाढ केली होती. यावर्षी कंपनी यापेक्षा थोडी जास्त वाढ करू शकते.