मुंबई : देशात अनेक राज्यांमध्ये काही प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेत चढ उतार दिसून येत आहेत. देशातील चालू आर्थिक घडामोडींचा परिणाम सोने चांदीच्या दरांवरही पहायला मिळतो. त्यापार्श्वभूमीवर मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे दरांमध्ये आज फारसा बदल घडून आलेला नाही. तर मुंबईतील बाजारातही तोच ट्रेंड पाहावयास मिळाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांमध्ये स्थिरता असतल्याने गेल्या काही दिवसांपासून कमी जास्त होणाऱ्या सोन्याच्या किंमती स्थिर झाल्याचे दिसून येत आहे. आनंदाची बाब म्हणजे सोन्याच्या किंमती गेल्या वर्षभरातील निच्चांकी दराच्या जवळपास स्थिर आहेत. त्यामुळे किरकोळ खरेदीदार तसेच गुंतवणूकदारांसाठी सोने खरेदीची ही चांगली संधी आहे..
सोने 47670 रुपये प्रतितोळे
चांदी 71550 रुपये प्रति किलो
22 कॅरेट 44,300 रुपये प्रतितोळे (+10)
24 कॅरेट 45,300 रुपये प्रतितोळे (+10)
71,900 रुपये प्रतिकिलो (+2000)
मुंबईत सोन्याच्या दरांमध्ये स्थिरता असली तरी चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
--------------------------------------------------------------
(वरील सोने - चांदीचे भाव जीएसटी आणि अन्य टॅक्स वगळून दिले आहेत, स्थानिक ज्वेलर्सप्रमाणे यात बदल होऊ शकतो.)