Gold Rate Today : दसऱ्याआधी सोनं खरेदी करण्याची संधी, सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण

दसऱ्याआधी सोनं लुटण्याची संधी...सोनं खरेदी करण्याआधी आजचे दर जाणून घ्या

Updated: Oct 14, 2021, 03:08 PM IST
Gold Rate Today : दसऱ्याआधी सोनं खरेदी करण्याची संधी, सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात चढउतार पायाला मिळत आहे. 14 कॅरेट सोन्याचे दर उतरले आहे. दसऱ्याला सोनं लुटण्याची आणि सोनं खरेदी करावं असं म्हणतात. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोन्या-चांदीचे दर उतरल्याने सोनं खरेदीसाठी ग्राहकांची सराफ मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळात सध्या तरी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली असली तरीही सराफ बाजारात मात्र 63 रुपयांनी सोन्याचे दर वधारले आहेत. 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 46,329 रुपये मोजावे लागणार आहे. चांदीच्या दरात  371 रुपयांनी तेजी आली आहे. एक किलो चांदीसाठी ग्राहकांना 60,788 रुपये मोजावे लागणार आहेत. 

इंडिया बुलियन एण्ड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडच्या मते कसे आहेत 24 ते 14 कॅरेट सोन्याचे आजचे दर

24 कॅरेट सोन्याचे दर - 47,487
23 कॅरेट सोन्याचे दर -  47,297
22 कॅरेट सोन्याचे दर - 43,498
18 कॅरेट सोन्याचे दर - 35,615
14 कॅरेट सोन्याचे दर - 27,780
चांदीचे दर- एक किलो चांदीसाठी - 62,136

 

शहरांनुसार  22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर कसे आहेत?

मुंबई- 22 कॅरेट सोनं- 46,300 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर- 47,300  
दिल्ली- 22 कॅरेट सोनं- 46,310 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर- 50,520 
कोलकाता- 22 कॅरेट सोनं- 46,710 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर- 49,410
चेन्नई- 22 कॅरेट सोनं- 44,450 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर- 48,490

गोल्ड रिटर्न वेबसाईटच्या मते 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 4,730 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्यासाठी 37,840 रुपये मोजावे लागणार आहेत. 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 47,300  रुपये मोजावे लागणार आहेत. 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 46,300 रुपये 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार आहेत.