भारतातील सर्वात महागड्या स्कुटरची बुकिंग सुरू; किंमत ऐकून बसेल धक्का

भारतात मीडियम साइजचे प्रीमियाम स्कूटर बीएमडब्लू C 400 GT सादर करण्यात आले आहे. 

Updated: Oct 14, 2021, 02:37 PM IST
भारतातील सर्वात महागड्या स्कुटरची बुकिंग सुरू; किंमत ऐकून बसेल धक्का

नवी दिल्ली : जर्मनीची लग्जरी कार निर्माती कंपनी BMW चे टु-व्हिलर युनिट बीएमडब्लू मोटररॅड (BMW MOTORRAD)ने मंगळवारी म्हटले की, भारतात मीडियम साइजचे प्रीमियाम स्कूटर बीएमडब्लू C 400 GT सादर करण्यात आली आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 9.95 लाख इतकी आहे.

कंपनीने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, स्कूटर पूर्णतः मॅन्युफॅक्चरिंग युनिट (CBU)च्या रुपात उपलब्ध होईल. मंगळवारपासून बीएमडब्लू मोटररॅड इंडिया सर्व डिलरशिपवर बुक केले जाऊ शकते.

350 सीसी चे फोर स्ट्रोक इंजिन
बीएमडब्लू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावाह यांनी म्हटले की, पूर्णतः नवीन बीएमडब्लू सी 499 जी टीला सादर करणे म्हणजेच भारतात अर्बन मुवमेंटच्या कॅटगिरीच्या नवीन युगाची सुरूवात आहे. या प्रगतीशील मध्यम आकारच्या स्कूटरला शहरात तसेच लॉंग टुरसाठी आरामदायी बनवण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. 

या स्कूटरला 350 सीसी डिस्प्लेसमेंट सोबत वाटर - कुल्ड सिंगल-सिलेंडर फोर- स्ट्रोक इंजिन असते. स्कूटरला तुम्ही 139 किमी प्रति तासच्या वेगाने चालवू शकता.

विना चावी स्टार्ट होणार स्कूटर
सी 400 GTचे पावर आऊटपूट 34 एचपी आहे. जे 25 Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरमध्ये विना चावीचे इग्निशन, युसबी चार्जिग आणि ब्लुटुथ कनेक्टिविटी सोबत टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्कूटरचे बॉडी पॅनल, एलईडी लाइट्स, ट्रॅक्शन कन्ट्रोल फीचर आणि सी वी टी ट्रान्समिशन इतर कोणत्याही स्कूटरपेक्षा खास आहेत.