मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. सोन्याच्या भावात आज प्रति 10 ग्रॅम 320 रुपयांची वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी जवळपास 46 हजार रूपये मोजावे लागत आहेत. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी जवळपास 47 हजार रूपये मोजावे लागत आहे. सोन्याच्या दरांत वाढ झाली असली तरी मागणी मात्र घटलेली नाही. सांगायचं झालं तर ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56 हजार 200 रूपयांवर पोहोचले होते. आता सोन्याचे दर 9 हजार रूपयांनी घसरले. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
जाणून घ्या शहरांमधील सोन्याचे दर
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई 46 हजार 750 47 हजार 750
चेन्नई 45 हजार 200 49 हजार 310
दिल्ली 46 हजार 550 50 हजार 550
कोलकाता 47 हजार 50 49 हजार 750
जाणून घ्या शहरांमधील चांदीचे दर
शहर 1 किलो
मुंबई 69 हजार 600
चेन्नई 74 हाजर 100
दिल्ली 69 हजार 600
कोलकाता 69 हजार 600
या वर्षाच्या अखेरीस सोन्याचे दर 60 हजार रूपयांवर पोहोचतील असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. जर आपण सोन्याच्या गुंतवणूकीबद्दल बोललो तर गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न दिला आहे.