मुंबई :Gold Price Today : जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांमध्ये आज वाढ नोंदवण्यात आली. सोमवारी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर वाढीसह सोने 51007 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करीत होते. त्याचबरोबर चांदीमध्येही चांगली तेजी नोंदवली गेली. चांदी 986 रुपयांनी वाढून 62655 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होते.
सराफा बाजारातही तेजी
सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी गुंतवणूकदार आणि किरकोळ खरेदीदारांनीही गर्दी केली. देशात आज 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) सोन्याचा दर 51,200 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 46,900 रुपये आहे. गेल्या 24 तासांत भारतातील विविध मेट्रो शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत चढ-उतार झाले.
मुंबईतील सोन्याच्या दर 52,090 रुपये प्रति तोळे इतके होते तर चांदीचे दर 61,700 रुपये प्रति किलो इतके होते.
मिस्ड कॉल देऊन सोन्या-चांदीची किंमती जाणून घ्या
किरकोळ बाजारात सोन्याच्या दागिन्यांचा दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे दराची माहिती मिळेल.