सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी, सोन्याचा भाव इतक्या हजारांपर्यंत खाली येणार

दिवाळी आधीच सर्वसामान्यांसाठी गोड बातमी, सोने आणि तेलाचे दर घसरणार

Updated: Oct 3, 2022, 06:59 PM IST
 सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी, सोन्याचा भाव इतक्या हजारांपर्यंत खाली येणार title=

मुंबई : सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी कपात होऊ शकते. यासोबतच खाद्यतेलाच्या दरातही (Edible oil) घसरण होणार आहे. केंद्र सरकारने या पंधरवड्यात वापरल्या जाणार्‍या तेल आणि सोने-चांदीच्या (Gold-Silver Price) मूळ आयात किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.  

तेलाच्या किंमतीत घसरण?
सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, जागतिक बाजारपेठेच्या किमतीत सुधारणा झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारने कच्च्या पाम तेलाची (Edible oil) आधारभूत किंमत 996 प्रति टन वरून 937 डॉलर केली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर पामतेलाच्या आधारभूत किमतीत घसरण होऊ शकते.

सोन्या-चांदीच्या दरात घट होणार? 
सोन्या-चांदीच्या (Gold-Silver Price) दरातही घट होण्याची शक्यता आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही उत्पादनाची मूळ आयात किंमत कमी झाल्यास, सीमाशुल्क आपोआप कमी होते. त्याचा थेट परिणाम भावावर दिसून येत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price) काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

सरकारने आरबीडीची मूळ किंमतही कमी केली आहे. ते 1,019 डॉलर वरून 982 डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कच्च्या सोयाबीन तेलाची आधारभूत किंमत 1,362 डॉलरवरून 1,257 डॉलर प्रति टन, सोन्याची आधारभूत किंमत 549 डॉलर प्रति 10 ग्रॅम वरून 553 प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची आधारभूत किंमत 635 डॉलर वरून कमी करण्यात आली असून ती 608 डॉलर प्रति किलो होणार आहे. 

किती खाली येणार सोने?
तज्ज्ञांच्या मते, सोन्याची किंमत (Gold Price)  49,650 रुपयांच्या खाली गेल्यास त्याची किंमत 48,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्यापेक्षा खाली घसरल्यास तो 46,600 रुपयांपर्यंत घसरू शकतो. जर सोन्यामध्ये घसरण होत असेल, तर तुमच्यासाठी खरेदी करण्याची ही चांगली संधी असणार आहे. त्यामुळे याचा सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.