उच्चांकी दरवाढीनंतर आज सोन्याचे भाव कोसळले, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे दर

Gold-Silver Price Today: आज सोन्याच्या दरात वाढ झाली की घट जाणून घ्या आजचे दर

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 28, 2025, 12:20 PM IST
उच्चांकी दरवाढीनंतर आज सोन्याचे भाव कोसळले, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे दर  title=
Gold Silver price slip from record high on MCX and spot gold check 22kt 24kt gold rates

Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, आज सोन्याच्या दर वाढीवर ब्रेक लागला आहे. सोनं वायदे बाजारात 80 हजारांच्या खाली पोहोचले आहे. सराफा बाजारातही आठ दिवसांपासून सोन्याच्या तेजीवर ब्रेक लागला आहे. मात्र, MCXवर सोन्याची झळाळी कायम आहे. 

सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. तर, चांदीच्या दरातही आज 167 रुपयांची झळाळी पाहायला मिळाली. चांदी 90,390 रुपये प्रति किलोग्रॅम वर स्थिरावली आहे. आंतरराष्ट्रीय दरावर घडणाऱ्या घडामोडींमुळं सोन्याची किंमत आज घसरली आहे. गेल्या आठ दिवसांत सोन्याने उच्चांकी दर गाठला होता. मात्र आता सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. 

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 320 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 81,930 रुपयांवर पोहोचले आहे. तसंच, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 300 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा 75,100 रुपयांवर स्थिरावले आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 240 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 61,450 रुपयांवर स्थिरावले आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  75,100 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  81,930 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  61,450रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,510 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,193 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,145 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   60,080 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   65,544 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    49,160 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 75,100 रुपये
24 कॅरेट- 81,930 रुपये
18 कॅरेट-  61,450रुपये

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x