बाप्पाच्या आगमनाआधी सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचा भाव ऐकून ग्राहकांना दिलासा

Gold-Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. बाप्पाच्या आगमनाबरोबरच ग्राहकांना आनंदाची बातमीही मिळाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 2, 2024, 11:41 AM IST
 बाप्पाच्या आगमनाआधी सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचा भाव ऐकून ग्राहकांना दिलासा
Gold-Silver Price Today 2nd Sep gold and silver price sees drops by 1000 rs per kg check latest updates

Gold-Silver Price Today: मागील आठवड्यात सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली होती. मात्र, आता आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे भाव गडगडले आहेत. चांदीच्या दरातही शुक्रवारी घट झाली होती. त्यानंतर आजही वायदे बाजारात चांदी जवळपास 1 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. सकाळी बाजार उघडताच सोनं 270 रुपयांनी स्वस्त झालं होतं. आज 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 72,770 रुपये इतके आहे. 

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हमध्ये सप्टेंबरमध्ये व्याज दरात कपात होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे अमिरेका निवडणुकांचा परिणामही सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. यूएस फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी नोकरदारांच्या स्थितीमुळं व्याजदरात कपात जवळपास निश्चित असल्याचे संकेत दिले होते. त्याचमुळं सोन्याचे दर त्याच श्रेणीत व्यवहार करत आहेत. भारतात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. अनेक जण बाप्पाचा सोन्या-चांदीचे दागिने भेट देतात. त्यामुळं तुम्ही देखील सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही संधी तुमच्यासाठी चांगली ठरणार आहे. 

आज सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची घट झाली आहे. त्यानुसार प्रतितोळा सोनं 66,700 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयांची घसरण झाली असून आज प्रतितोळा 72,770 रुपये इतके आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 210 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं आज प्रतितोळा सोनं 54,570 रुपये इतके आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  66,700 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  72, 770 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  54, 570 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 670 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 277 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 457 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   53, 360 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   58, 216 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    43, 656 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 66,700 रुपये
24 कॅरेट- 72, 770 रुपये
18 कॅरेट- 54, 570 रुपये

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x