सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, कॅगकडून 10 हजारांहून अधिक पदांसाठी भरती

 सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुर्वण संधी 

Updated: Jan 27, 2021, 04:25 PM IST
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, कॅगकडून 10 हजारांहून अधिक पदांसाठी भरती

मुंबई : तुम्ही जर सरकारी नोकरी शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुर्वण संधी चालून आली आहे.कॅग संस्थेने 10 हजारांहून अधिक पदांसाठी भरती काढलीय..ऑडिटर, अकाऊंटंट पदासाठी तरुणांना अर्ज करता येणार आहे. 10 हजार ८११ पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेयत.19 फेब्रुवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

सरकारी संस्था कॅगने २०२१ या नव्या वर्षात 10 हजारांहून अधिक पदांसाठी भरती जाहीर केलीय. कॅगच्या अधिकृत वेबसाईट cag.gov.in वर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 10 हजार पदांसाठी तुम्हाला 19 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. जास्त करून ऑडिटर आणि अकांऊटंट पदासाठी भरती करण्यात येतेय.