राज्यासाठी महत्वाची बातमी, नितीन गडकरींच्या बैठकीला जयंत पाटील उपस्थित

महाराष्ट्र राज्यातील (Maharashtra) विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी दिल्लीत आज महत्वाची बैठक होत आहे.  

Updated: Jan 27, 2021, 12:58 PM IST
राज्यासाठी महत्वाची बातमी, नितीन गडकरींच्या बैठकीला जयंत पाटील उपस्थित
संग्रहित छाया

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील (Maharashtra) विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी दिल्लीत आज महत्वाची बैठक होत आहे. राज्यातल्या सिंचन प्रकल्पांबाबत (Irrigation project) ही महत्त्वाची बैठक होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थित ही बैठक होत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. जलसिंचनाचे अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. ते मार्गी लावण्यासाठी ही महत्वाची बैठक होत आहे. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची आज नवी दिल्लीत बैठक होतेय. गडकरींच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. राज्यातल्या सिंचन प्रकल्पांबाबत ही महत्त्वाची बैठक आहे. बैठकीला जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, भाजप खासदार प्रकाश जावडेकर यांच्यासह काही खासदार आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. 

महाराष्ट्रात गेल्या काही दशकात दुष्काळ पडला आहे. एकूण ३६ जिल्ह्यांपैकी २६ जिल्हे या दुष्काळात सापडले होते. यात एकूण ८२ लाख, २७ हजार १६६ शेतकरी बाधित झाले. त्यांची एकूण ८५ लाख, ७६ हजार, ३६७ हेक्टर शेतजमिनीवर दुष्काळाची छाया होती. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत तीन वेळा दुष्काळ पडल्यामुळे शेतीच्या पीक उत्पादनावर परिणाम झाला आहे. पीक उत्पादनाचा वेग घटला आहे. त्यामुळे जलसिंचन प्रकल्प महत्वाचे आहेत. जलसिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून काही प्रमाणात दुष्काळावर मात करता येऊ शकते. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. 

केंद्र सरकार हे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी किती सहकार्य करणार याची उत्सुकता आहे. कारण सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने केंद्राकडून निधी कमी मिळत असल्याचे ओरड होत आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन ही बैठक बोलावल्याने राज्यातील जलसिंचनाचा प्रश्न मार्गी लागले, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.