मुंबई : 7th Pay Commission: बऱ्याच काळापासून महागाई भत्तेची (Dearness allowance) वाट पाहत असलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी (Central Government Employee's) चांगली बातमी आहे. सरकारी कर्मचार्यांचा वाढलेला पगार (salary) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission Update) सप्टेंबरमध्ये येणार आहे. तथापि, यापूर्वी जुलैच्या पगारामध्ये वाढलेल्या डीएचे ( DA) पैसे असल्याची अटकळ होती. परंतु आता हे स्पष्ट झाले आहे की, आता सप्टेंबरअखेर पगारासह शेवटचे तीन हप्तेही मिळतील. आपण देखील केंद्रीय कर्मचारी असल्यास, सप्टेंबर महिन्यात आपला पगार किती वाढेल हे समजेल.
केंद्रीय कर्मचार्यांना सप्टेंबरच्या पगारामध्ये मोठी वाढ मिळेल. या नवीन घोषणेनंतर आपला पगार किती वाढेल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आपला मूलभूत पगार माहीत असणे आवश्यक आहे. तसेच आपण आपला वर्तमान डीए पाहू शकता. आत्ता हे 17 टक्के आहे जे डीएच्या वाढीनंतर 28 टक्क्यांपर्यंत जाईल. केंद्रीय कर्मचार्यांच्या मासिक डीएमध्ये 11 टक्के वाढ होईल. अशा प्रकारे 1 जुलै 2021 पासून डीए मूलभूत वेतनाच्या 11 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्याचवेळी, तेच सूत्र डीआरच्या गणनामध्ये देखील लागू होईल.
नॅशनल कौन्सिल ऑफ JCMचे शिव गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार केंद्रीय कर्मचार्यांचे महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना महागाई सवलतीत थोडा वेळ लागेल. परंतु त्यांचे वेतन चांगले वाढेल. वर्ग 1 अधिकाऱ्यांचा डीए थकबाकी 11,880 ते, 37,544 रुपयांच्या दरम्यान असेल. ते म्हणाले की, स्तर-13 म्हणजेच 7th व्या वेतन आयोगानुसार मूलभूत वेतनश्रेणीची किंमत 1,23,100 ते 2,15,900 किंवा पातळी -14 पर्यंत मोजली गेली तर केंद्र सरकारच्या कर्मचार्याचा डीए थकबाकी 1,44,200 रुपये ते 2,18,200 पर्यंत असेल.