रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात महत्वाची बातमी आणि खुशखबर

रेल्वे प्रवाशांसाठी आता खुशखबर आहे. कन्फर्म रेल्वे तिकीट आता हस्तांतर करता येणार आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 10, 2018, 10:10 PM IST
रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात महत्वाची बातमी आणि खुशखबर title=

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी आता खुशखबर आहे. कन्फर्म रेल्वे तिकीट आता हस्तांतर करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. नातेवाईकांनाच तिकीट हस्तांतर करता येणार आहे. 

तिकीट हस्तांतरीत करता येणार

पती, पत्नी, मुले, आई, वडील, भाऊ, बहिण यांना तिकीट हस्तांतरीत करता येईल.  24 तासापूर्वी तिकीट हस्तांतरणाचा अर्ज भरून द्यावा लागेल. त्यानंतरच कन्फर्म तिकीट कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने हस्तांतर करता येईल.