व्हॉट्सअ‍ॅपवरील अफवेमुळे गूगलच्या इंजिनियरचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू

हाराष्ट्रात राईनपाड्यातील हत्याकांडाची घटना ताजी असताना असाच प्रकार कर्नाटकामध्येही घडला आहे. 

Updated: Jul 16, 2018, 11:33 AM IST
व्हॉट्सअ‍ॅपवरील अफवेमुळे गूगलच्या इंजिनियरचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू  title=

कर्नाटक : महाराष्ट्रात राईनपाड्यातील हत्याकांडाची घटना ताजी असताना असाच प्रकार कर्नाटकामध्येही घडला आहे. मुलं चोरण्याची टोळी असल्याचा समज झाल्याने गावकर्‍यांनी चार युवकांवर हल्ला केला. यामध्ये एका युवकांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तिघांची प्रकृती गंभीर आहे. 

हैदरामध्ये दाखल 

बिदर जिल्ह्यातील औरादभागामध्ये मुलं चोरीच्या टोळीचा भाग आहे असे समजून  मोहम्मद आजम अहमद या तरूणावर हल्ला झाला. जमावाने मोहम्मदला बेदम मारहाण केल्याने तो जागीच ठार झाला. मोहम्मद हा गूगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होता. जमावाने हल्ला केलेल्या चार तरूणांपैकी एक कतारचा नागरिक आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपवर या चार तरूणांचा मुलं चोरण्याच्या टोळीशी संबंध आहे अशा आशयाचे मेसेज, फोटो फिरत होते. पोलिसांनी या प्रकरणी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या 3 अ‍ॅडमीन्सला अटक केली आहे. सोबतच जमावाचा भाग असणार्‍या 30 लोकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

सामाजिक कार्यक्रमाचा भाग 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाने हल्ला केलेले चारही तरूण एका सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम आटपून परतताना ते एका शाळेजवळ थांबले. त्या शाळेजवळील जमीन खरेदीबाबत त्यांचे भविष्यात काही प्लॅन्स होते. शाळेजवळ थांबल्यानंतर कतारचा नागरिक असलेल्या एका व्यक्तीने मुलांना विदेशी चॉकलेट देऊ केले. 

चॉकलेट देताना पाहून गावकर्‍यांमध्ये हे युवक त्यांना भुलवण्याचा प्लॅन करत असल्याचे पसरवण्यात आले. बघता बघता गर्दी जमली. चहुबाजूंनी युवकांना मारहाण करण्यात आली. गर्दीतून पळ काढत त्यांनी इनोव्हा कारकडे धाव घेतली. दरम्यान जमावाने त्यांचे फोटो क्लिक केले. हे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल करण्यात आले. सोबतच हे मुलं चोरण्याच्या टोळीचा भाग असून त्यांना रोकलं पाहिजे अशा आशयाचे मेसेज पसरवण्यात आले. 

रस्त्यामध्ये झाड पाडून या तरूणांची गाडी अडवली गेली. त्यानंतर पुन्हा जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. दोन पोलिसांना जमावाला रोखणं अशक्य झाले.